भगवान महावीर अभयारण्यात सापडलेल्या मृत काळा बिबटाप्रकरणी एसओपीचे पालन करून तपास

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th January, 12:16 pm
भगवान महावीर अभयारण्यात सापडलेल्या मृत काळा बिबटाप्रकरणी एसओपीचे पालन करून तपास

पणजी : भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात (Bhagwan Mahaveer Sanctuary and National Park) काळा बिबटा (Black Panther) मृतावस्थेत आढळला. परिसरातील ट्रान्सफॉर्मरचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरीही याप्रकरणी नियमानुसार व एसओपीचे पालन करून तपास केला जात आहे. 

माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने मृत बिबट्याला तत्काळ ताब्यात घेऊन पुढील सोपस्कारासाठी पाठवले. एका वन अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीही सुरू आहे. ‘‘वरवर पाहता परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू पावल्याचे दिसत असल्याचे’’ त्या अधिकाऱ्याने सांगितले.

कार्यपद्धतीनुसार, वन्यजीवांचा अनैसर्गीक मृत्यू झाल्यास वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जातो आणि सखोल चौकशी केली जाते. या प्रकरणात सर्व व‌िहित कार्यपद्धती आणि मानक कार्यप्रणाली (एसओपी) यांचे काटेकोरपणे पालन करून पुढील चौकशी केली जात असल्याचे वन विभागाने सांगितले. 

हेही वाचा