
सातारा : महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा (Satara) येथे सुरू असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना संमेलन स्थळीच एकाने काळे फासले. याप्रकरणी पोलिसांनी (Maharashtra Police) एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव संदीप जाधव असे असून, काळे का फासले हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे संमेलनाच्या ठिकाणी एकच खळबळ माजली. ताब्यात घेतलेल्या युवकाची पोलीस चौकशी करीत आहेत.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरात सुरू आहे. या संमेलनाला शनिवारी संदीप जाधव हा युवक आला होता. काही वेळानंतर या युवकाने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासले. नंतर ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा दिल्या व राष्ट्रगीत म्हटले. संदीप जाधवने कशासाठी काळे फासले हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
कुलकर्णी यांच्याकडून निषेध
दरम्यान, या प्रकाराचा कुलकर्णी यांनी निषेध केला आहे. किती लोक होते याची आपल्याला माहिती नाही व मी त्यांना ओळख नसल्याचे कुलकर्णी म्हणाले. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. साहित्यिक संस्थेत राजकीय हस्तक्षेप नको ही आपली ठाम भूमिका आहे. साहित्य सेवेसाठी मी काम करतो. विचाराची लढाई विचाराने करावी. या कार्यकर्त्याने यापूर्वीही वेगवेगळ्या घटनेत अशा प्रकारचे कृत्य केले आहे. पोलीस पकडण्यासाठी आल्यावर राष्ट्रगीत म्हणत असतो. त्यामुळे कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.