इंदूर मधील दूषित पाण्याचा धोका वाढला; १,४०० जणांना अतिसाराची लागण : १० जणांचा मृत्यू

६ महिन्याच्या बालकाचाही समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
इंदूर मधील दूषित पाण्याचा धोका वाढला; १,४०० जणांना अतिसाराची लागण : १० जणांचा मृत्यू

इंदूर : मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील इंदूर (Indore) मधील दूषित पाण्याच्या (Polluted Water) समस्येचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत १,४०० हून अधिक जणांना अतिसाराची लागण झाली आहे. १० जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सहा महिन्याच्या एका चिमुकल्याचा समावेश आहे.

धोका वाढल्यानंतर राज्य सरकारने इंदूर महापालिकेचे आयुक्त दिलीपकुमार यादव यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रोहन सिसोनिया यांची बदली करण्यात आली आहे तर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप निगम यांना निलंबित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व १६ महापालिकांचे महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बैठक बोलावून आढावा घेतला. इंदूर येथील दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. अन्य शहरांत खबरदारीची उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. 

पाणी दूषित असल्याचे अहवालात स्पष्ट 

इंदूरमध्ये अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १,४०० च्या वर गेली आहे. दूषित पाण्यामुळेच अतिसाराची लागण झाल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. इंदूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसनी यांनी माहितीला दुजोरा दिला आहे.

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या अव्याहनचा मृत्यू 

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या सहा महिन्यांच्या अव्यान साहू या बालकाचाही अतिसारामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे १० जणांचा बळी गेल्याचा दावा महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी केला आहे तर इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी बळींची संख्या

हेही वाचा