३,९५० शेतकाऱ्यांना ३.६८ कोटींची नुकसान भरपाई

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
03rd January, 03:04 pm
३,९५० शेतकाऱ्यांना ३.६८ कोटींची नुकसान भरपाई

पणजी : अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या ३,९५० शेतकाऱ्यांना ३.६८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्याहस्ते देण्यात आली. डिचोली (Bicholim) येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्यातल्या सर्व शेतकरी (Farmers) बांधवांना अवकाळी पावसामुळे (Rain) नुकसान झालेल्यांना शेतकरी आधार निधी योजनेखाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मान्यता पत्रे देवून त्यांना आर्थ‌िक मदत देण्यात आली. 

अडचणीच्या वेळी राज्यात एक शेतकरीही वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. चांगल्या व वाईट काळात शेतकाऱ्यांबरोबर उभे राहण्यासाठी गोवा सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. शेतकाऱ्यांना पारदर्शकता आणि संवेदनशीलता बाळगून वेळीच सहाय्य मिळणार हे सुनिश्चित करून आम्ही शेतकाऱ्यांना सुरक्षितता, शाश्वतता आणि सन्मान देतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

हेही वाचा