करमळीतील मेगा प्रकल्पाला काम बंद करण्याचे आदेश

करमळी मेगा प्रकल्पाची होणार चौकशी : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत; तांत्रिक परवाना रद्द करण्याबाबत टीसीपीने जारी केली नोटीस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
06th January, 03:40 pm
करमळीतील मेगा प्रकल्पाला काम बंद करण्याचे आदेश

पणजी :  (Goa) करमळीतील (Karmali) मेगा गृहनिर्माण प्रकल्पाला (Mega Housing Project) दिलेल्या परवान्यांची चौकशी करण्याचे निर्देश नगरनियोजन मंत्री (TCP Minister) विश्वजित राणे यांना दिले आहेत. काम बंद करण्याचा आदेश जारी झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

करमळीतील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने सोमवारी टीसीपी कार्यालयात धडक दिल्यानंतर नगरनियोजन खात्याने काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तांत्रिक परवाना (टेक्नीकल क्लीअरन्स) रद्द करण्याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीसही जारी केली आहे. या नोटीसीला ७ दिवसांत उत्तर देणे बंधनकारक आहे.

करमळीतील मेगा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी ४ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. या प्रकल्पाला कायद्याचा विचार न करता मान्यता दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला होता. निवेदनानंतर ५ डिसेंबर रोजी प्रकल्पाची संयुक्तपणे पहाणी करण्यात आली. यावेळी सांत आंद्रेचे आमदार, सरपंच, पंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती. पाहणीत खालील गोष्टी आढळल्या

- इमारतीपासून जवळच्या स्मशानभूमीपर्यंतचे अंतर नियमानुसार नाही.

- इमारतीच्या दक्षिण बाजूला १५ मीटर व पश्चिम बाजूला १० मीटरचा रस्ता उपलब्ध नाही.

यानंतर उपनगरनियोजकानी काम बंद करण्याचा आदेश देताना तांत्रिक परवाना रद्द करण्याची नोटीस जारी केली. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रकल्पाला नोटीस पाठविणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा