ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या ८३ व्या वर्षी पुणे येथे निधन : आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
08th January, 09:31 am
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : भारतात (India) पर्यावरणाची (Environment) चळवळ बळकट करणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ (८३ वर्षे)  (Ecologist, Environment Expert Dr. Madhav Gadgil) यांचे निधन झाले. पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलात बुधवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एक निवेदन जारी करून माधव गाडगीळ यांच्या निधनाची माहिती दिली.

पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षणकर्ते व पर्यावरण चळवळीतील अग्रणी डॉ.माधव गाडगीळ यांच्यावर पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा