दोन-चार जागा न लढवल्यासही भाजपला मिळतील ५२ टक्के मते

दामू नाईक : लोकसभेतील मतदारांना विधानसभेत पक्षासोबत ठेवण्याचे प्रयत्न


7 hours ago
दोन-चार जागा न लढवल्यासही भाजपला मिळतील ५२ टक्के मते

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत दोन-चार जागा लढवल्या नाही, तरीही भाजप ५२ टक्क्यांपर्यंत मते मिळवू शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला जे मतदार मते देतात, त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षासोबत ठेवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पणजीतील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकण्याचा नारा दामू नाईक यांनी दिला. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत ५२ टक्क्यांपर्यंत मते भाजपला मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले होते. शुक्रवारी पणजीतील खासगी कार्यक्रमात बोलताना, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत दोन-चार जागा लढवल्या नाही, तरीही भाजप ५२ टक्क्यांपर्यंत मते मिळवू शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला जे लोक मतदान करतात, त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षासोबत ठेवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आगामी जिल्हा पंचायत, पा​लिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी दामू नाईक यांनी राज्यभर दौरे करून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत चाळीसही मतदारसंघांत लढण्याच्या हेतूने प्रत्येक मतदारसंघ बळकट करण्यावर त्यांनी भर दिला आहे.