सासष्टी : आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ प्रतिसाद, समन्वय साधता यावा यासाठी रंगीत तालीम

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी तालुका स्तरावरील कमांडर अधिकार्‍यांसह घेतला आढावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 12:24 pm
सासष्टी : आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ प्रतिसाद, समन्वय साधता यावा यासाठी रंगीत तालीम

मडगाव:  दक्षिण गोव्यात शुक्रवारी सकाळी चक्रीवादळासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ प्रतिसाद आणि समन्वय तपासण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. लोकांची सुरक्षित सुटका, निवारा व्यवस्था, आरोग्य सेवा, संवाद यंत्रणांची कार्यक्षमता आणि प्रशासनाच्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.




मुरगाव पोर्ट, गोवा शिपयार्ड, बायना, फोंडा, नाकेरी-बेतूल आदी ठिकाणी आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. नौदल, कोस्टगार्ड, स्वयंसेवी संस्था, पंचायत प्रतिनिधी, आणि प्रशासन यांनी यात सहभाग नोंदवला.



तालुका स्तरावरील कमांडर अधिकाऱ्यांनी परिस्थितीची माहिती जिल्हास्तरावर सादर केली. जिल्हाधिकारी क्लिटस यांनी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. संवाद यंत्रणा, जीएसआय सुविधा, इस्पितळे, शेल्टर आणि इतर आवश्यक सेवा सक्रिय ठेवण्याचा सराव करण्यात आला. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी हा सराव घेण्यात आला. 


हेही वाचा