पणजी : दुकानदाराला कामगारानेच ५ लाखांना गंडवले!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th April, 01:55 pm
पणजी : दुकानदाराला कामगारानेच ५ लाखांना गंडवले!

म्हापसा : पणजी मार्केटमधील एका काजू विक्री दुकानदाराला त्याच्याच कामगाराने ५ लाखांचा गंडा घातला. बँकेत जमा करण्यासाठी दिलेली रक्कम परस्पररित्या घेऊन पसार झाल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी विरमाराम परमार (२७, रा. मूळ राजस्थान) याच्या विरुद्ध अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शुक्रवारी २५ रोजी सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी किशोर भाटी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे पणजी मार्केटमध्ये काजूबिया विक्री दुकान आहे. या दुकानात संशयित परमार कामाला होता.

तक्रारदाराने संशयित विरमारम परमार याच्याकडे पणजीतील आपल्या कॅनरा बँकेच्या खात्यात ५ लाख रुपये रक्कम जमा करण्यासाठी दिली. बराचवेळ संशयित पैसे जमा करून आला नाही, शिवाय त्याचा मोबाईल देखील बंद असल्याचे समजल्यानंतर तक्रारदाराने बँकेत जाऊन चौकशी केली. तिथे संशयित कामगाराने बँक खात्यात पैसे जमा केले नसल्याचे समजले.

कामगाराने आपल्याला गंडा घातल्याचे तक्रारदाराचा लक्षात येताच त्यांनी पणजी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक यांनी संशयित विरमाराम परमार याच्याविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१६(४) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

हेही वाचा