सासष्टी : 'गावातील लोकांनाच भेडसावतेय कचरा, पाणी आणि विजेची समस्या, त्यामुळेच..' : सरपंच फर्नांडिस

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10 hours ago
सासष्टी : 'गावातील लोकांनाच भेडसावतेय कचरा, पाणी आणि विजेची समस्या, त्यामुळेच..' : सरपंच फर्नांडिस

मडगाव : बेतालभाटी येथील ग्रामस्थांनी गावाच्या सीमेवर उभारलेले सूचनाफलक सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरलेत. गावातील आवश्यक संसाधने संपुष्टात आलेली असून प्रमोटर, डेव्हलपर्स व बिल्डर यांनी आपल्या जोखमीवर येथे जमीन खरेदी करावी असा मजकूर त्यावर लिहलेला आहे. दरम्यान ग्रामसभेच्या ठरावानुसार हे फलक उभारण्यात आल्याचे सरपंच अँथनी फर्नांडिस यांनी सागितले. विविध स्तरातून या फलकांना पाठिंबाही मिळत आहे. इतर ग्रामपंचायतींनीही अशाप्रकारे फलक उभारून गावात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध दर्शवून गावातील जमिनींचे संरक्षण व संवर्धन करावे, असेही संदेश व्हायरल होत आहेत.


 याबाबत सरपंच अँथनी फर्नांडिस यांना विचारणा केली असता, गावातील लोकांनाच सध्या आवश्यक प्रमाणात वीज पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामसभेत नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येऊ नये असे सांगण्यात आले होते. गावातील लोकांना पाण्याचा प्रश्न असताना नव्याने येणाऱ्यांना न हरकत दाखला दिला जातो. पण त्यांना पाणी उपलब्ध करताना पंचायतीला त्रास होतो. या ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाला कुणीही विरोध केलेला नाही. त्या ठरावानुसार गावाच्या सीमांवर सूचनाफलक उभारण्यात आलेले आहेत हे केवळ माहितीसाठी आहेत जमिनी घेतल्यानंतर त्यांच्यासमोर अडचणी येऊ नये यासाठी आधीच हा इशारा देण्यात आलेला आहे जमिनी घेऊ नका किंवा इतर कोणताही सल्ला देण्यात आलेला नाही हा फलक केवळ माहितीसाठी लावण्यात आलेले आहेत.


Action initiated against public servants over illegal constructions in  Kasauli: Himachal Pradesh, ET RealEstate


काही प्रकल्पांवेळी नगर नियोजन खात्याकडून आवश्यक तांत्रिक परवानगी मिळवली जाते. पण प्रत्यक्षात रस्त्याची लांबी कमी असणे व इतर अनेक त्रुटी असतात. तसेच स्थानिकांकडूनही ग्रामसभांमध्ये नव्या प्रकल्पांना परवानगी न देण्याबाबत ठराव घेण्यात येतात परंतु सर्व तांत्रिक व इतर परवानगी घेण्यात आलेल्या असल्याने पंचायतीला कागदपत्रे पाहून ना हरकत दाखला द्यावा लागतो. काही वेळा बाहेरून आलेल्या प्रकल्पाला कारवाई करण्यास गेल्यास त्या ठिकाणी तशाच परवानगी मिळवून स्थानिकांनीही प्रकल्प उभारल्याचे दिसून येते. त्यामुळे कायदा सर्वांना समान असल्याने पंचायतीला सबुरीने घ्यावे लागते, असे सरपंच म्हणाले. 




गावात स्थानिकांना आवश्यक वीज व पाणीपुरवठा होत नाही. मागील काही वर्षांपासून अनियंत्रित रित्या सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामस्थांना यापुढे आणखी समस्यांना तोंड द्यावे लागू नये यासाठीच सूचनाफलकांची मागणी ग्रामसभेत करण्यात आलेली होती. त्यानुसार पंचायतीकडून फलकांची उभारणी केलेली आहे गावात सध्या कचऱ्याचा प्रश्नही उद्भवू लागलेला आहे. त्यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्यास नव्याने येणाऱ्यांना आवश्यक सुविधा पंचायतीकडून पुरवल्या जाऊ शकत नाहीत हे सांगण्यासाठीच फलकांची उभारणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा