मन की बात : भाग १२१ | पीडितांना न्याय नक्की मिळवून देणार; मोदींचा निर्धार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 04:18 pm
मन की बात : भाग १२१ | पीडितांना न्याय नक्की मिळवून देणार; मोदींचा निर्धार

नवी दिल्ली : आज, २७ एप्रिल २०२५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी २२  एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.​

पहलगाममध्ये झालेला हा हल्ला दहशतवाद्यांच्या भ्याड मानसिकतेचे प्रतीक आहे. काश्मीरमध्ये शांतता परत येत होती. शाळा-कॉलेजांमध्ये उत्साह होता, पर्यटन वाढत होते, आणि लोकशाही मजबूत होत होती. हे त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी काश्मीरला पुन्हा अस्थिर करण्याचा कट रचला, पंतप्रधान मोदी म्हणाले. या हल्ल्यामुळे माझ्या मनात वेदना आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात पीडित कुटुंबांप्रती सहानुभूती आहे. मी पीडित कुटुंबांना पुन्हा एकदा विश्वास देतो की, त्यांना न्याय मिळेल आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांनी पुढे सांगितले. 

आंतरराष्ट्रीय प्रतिसाद आणि एकता 

या हल्ल्यानंतर जगभरातून संवेदना व्यक्त केल्या गेल्या आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी मला फोन करून किंवा पत्राद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे. संपूर्ण जग १४०  कोटी भारतीयांसोबत उभे आहे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आमचा पाठिंबा देत आहे असे, पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

हेही वाचा