सासष्टी : कुडतरीतील तळ्यात मिळाली बंपर मासळी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 03:36 pm
सासष्टी : कुडतरीतील तळ्यात मिळाली बंपर मासळी

मडगाव : कुडतरी येथे असलेल्या तळ्यातील मासळीसाठी लिलाव करण्यात आलेला होता. त्यानुसार रविवारी सकाळी मासळी पकडण्यात आली असता यापूर्वी कधीही मिळाली नाही, तेवढी मासळी यावर्षी मिळाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या मासळीच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी गर्दी केली होती. 




 कुडतरीतील तळ्यातील मासळी रविवारी सकाळी पकडण्यात आली. यावेळी मासळी पकडणार्‍या शेतकर्‍यांनी सांगितले की, यावर्षी जेवढी मासळी मिळालेली आहे, तशी याआधी कधीच मिळालेली नाही. यावेळी केवळ एक तासभर मासळी पकडण्यात आली. पुढील रविवारी पुन्हा मासळी पकडली जाईल. दरवेळी ५०० रुपये प्रती किलो दराने मासळी दिली जात होती. यावर्षी ५०० रुपयांत अडीच किलो अशी मासळीची विक्री करण्यात आली, त्यामुळे लोकही खूश आहेत, असेही त्यांनी सांगितले. 



कुडतरीतील तळ्यात पकडण्यात आलेली मासळी. (संतोष मिरजकर)

कुडतरीत सहा तळी असून सर्व तळ्यांच्या संवर्धन केले जाणार आहे. यावर्षी तळ्यातील मासळी पकडण्यात आल्यानंतर चिकाली, चणाक यासह इतर मासळी मिळाली. तळ्यासाठीची समिती मासळीसाठी लिलाव जाहीर करते व लिलावात मासळी पकडण्याचा कंत्राट ज्याला मिळतो तो मासळी पकडून विक्री करतो. यातून समितीला मिळणारा पैसा हा तळ्याच्या साफसफाईसाठी, बांध सफाईसाठी व शेतकर्‍यांच्या विविध कामांसाठी वापरला जातो. तळ्याला ५० मीटरचा बफर झोन आहे. कुडतरीला कृषी ग्राम म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न आहे. वारशाने जी नैसर्गिक संपदा मिळालेली आहे, ती राखून ठेवण्यासाठी, परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न असेल, असे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.


हेही वाचा