बार्देश : कदंब डेपो नजीक टेम्पोच्या धडकेत एकजण जागीच ठार


9 hours ago
बार्देश : कदंब डेपो नजीक टेम्पोच्या धडकेत एकजण जागीच ठार

पणजी : पर्वरी येथे कदंब डेपोनजिक असलेल्या राष्ट्रोळी महारुद्र मंदिराजवळ आज सकाळी ११.३० वाजता भीषण अपघात घडला. यात एकजण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. 



प्राथमिक माहितीनुसार, कदंब डेपोकडून मंदिराच्या दिशेने सुसाट येणाऱ्या टेम्पोने आपल्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये प्रवेश केला. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व टेम्पोची धडक मंदिराबाहेर बाकावर बसलेल्या उमेश मुट्टागी (सुकुर,३५) याला बसली. यात उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर टेम्पो उलटला. टेम्पोची धडक बसून दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. 




पोलिसांना पाचारण केल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


  

हेही वाचा