सांताक्रूझ : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या व्यक्तीला जूने गोवे पोलिसांनी वाचवले

केले मनोरुग्णालयात दाखल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
सांताक्रूझ : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या व्यक्तीला जूने गोवे पोलिसांनी वाचवले

पणजी :  कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात असलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नातून जुने गोवे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाचवले.

हाती आलेल्या प्राथमिक महितीनसुआर, २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.२४ वाजता पोलीस नियंत्रण कक्ष पणाज़ी येथून जुने गोवे पोलिसांना सांताक्रूजमधील मादिर भागात राहणारा एक व्यक्ती गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या आधारे  जुने गोवे पोलिसांनी अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला सुरक्षितपणे वाचवले.

प्राथमिक चौकशीत पत्नी व मुलीपासून विभक्त झाल्याने संबंधित व्यक्ती मानसिक तणावाखाली  असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला धीर दिला आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार बांबोळी येथील मानसोपचार व मानसिक आरोग्य रुग्णालयात (आयपीएचबी) उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा