शिष्टमंडळात गोव्याचे उपसभापती जोशुआ डिसोझा यांचा समावेश.
नवी दिल्ली : पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू व्हॅटिकन सिटीला रवाना झाले आहेत. या शिष्टमंडळात केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोव्याचे उपसभापती जोशुआ डिसोझा यांचाही समावेश आहे.
राष्ट्रपती मुर्मू २५ एप्रिल रोजी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे श्रद्धांजली अर्पण करतील. नंतर २६ एप्रिल रोजी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील. पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी २१ एप्रिल रोजी व्हॅटिकनमधील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भारत सरकारने २२, २३ आणि २६ एप्रिल रोजी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. २६ एप्रिल रोजी देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यासह सरकारी पातळीवर करमणुकीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत.