आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

सावधान ! येतोय ज्वेल थीफ !

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 12:35 am
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

आज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आणि चित्रपटगृहात एकापेक्षा एक दमदार आणि मनोरंजक चित्रपट, सिरीज प्रदर्शित होणार आहेत. यात क्राईम थ्रिलरपासून कोरियन ड्रामा, अ‍ॅक्शन चित्रपट आणि हॉरर थ्रिलरचा समावेश आहे.


ज्वेल थीफ : द हिस्ट बिगिन्स । नेटफ्लिक्स
सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्या अभिनयाने सजलेला हा थ्रिलर, दोन चोरट्यांदरम्यानच्या बुद्धी आणि इच्छाशक्तीच्या लढाईवर आधारित आहे, जे आफ्रिकेतील ‘रेड सन डायमंड’ चोरायचा प्लान करतात. चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी आणि रॉबी गरेवाल यांनी केले आहे. सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत या चित्रपटात निकिता दत्ता आणि कुणाल कपूर यांच्याही भूमिका आहेत.


ग्राऊंड झिराे । थिएटर्स
इम्रान हाश्मी आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही कथा आहे बीएसएफ अधिकारी नरेंद्रनाथ दुबे यांच्या सत्य घटनेवर आधारित, ज्यांनी गाझी बाबा या दहशतवाद्याचा माग काढला होता.


काजिलियनेअर । जिओहॉटस्टार
एक गुन्हेगारी विनोदी कथा जिथे ओल्ड डोलिओ डायन ही तरुणी तिच्या गुन्हेगार पालकांबरोबर एका हेराफेरीत सामील होते आणि नंतर त्यांच्या आयुष्यात एक अनोळखी व्यक्ती प्रवेश करताच सर्व काही बदलते. या चित्रपटात इव्हान राहेल वूड, जीना रॉड्रिग्ज, डेब्रा विंगर, रिचर्ड जेनकिन्स यांच्या प्रमूख भूमिका असून मिरांडा जुलै यांचे दिग्दर्शन आहे.


हावॅक । नेटफ्लिक्स
ही एक गुप्तहेराची कथा आहे. जो एका अयशस्वी ड्रग्जच्या डिलनंतर एका राजकारण्याच्या मुलाला वाचवण्यासाठी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो. नंतर तो भ्रष्टाचार आणि कटाच्या जाळ्यात अडकतो. या चित्रपटात टॉम हार्डी, जेसी मेई ली, टिमोथी ऑलिफंट आणि फॉरेस्ट व्हिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


द अकाउंटंट २ । थिएटर्स
गॅव्हिन ओ'कॉनर दिग्दर्शित, हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून बेन एफ्लेक एका ख्रिश्चन वोल्फ नावाच्या गणितज्ज्ञाच्या भूमिकेत आहे. ताे त्याचा भाऊ ब्रॅक्स (जॉन बर्नथल) सोबत मिळून एका गूढ संदेशाचा उलगडा करतात. त्यानंतर हे दोघेही धोकादायक गुन्हेगारांच्या एका प्राणघातक कटात अडकतात.


अनटिल डावन । थिएटर
हा मानसशास्त्रीय भयपट थ्रिलर चित्रपट मित्रांच्या एका गटाभोवती फिरतो, जे एका टाइम लूपमध्ये अडकतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो तो म्हणजे पहाटेपर्यंत जगणे. या चित्रपटात एला रुबिन, मायकेल सिमिनो आणि ओडेसा अझिओन यांच्यासह इतर कलाकार आहेत.