बिहार येथून घरातून पळालेली मुलगी सापडली मडगावात

मुलगी बाल कल्याण समितीच्या ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:55 pm
बिहार येथून घरातून पळालेली मुलगी सापडली मडगावात

मडगाव : बिहारमधील मुंगेर परिसरातून घरातून पळालेल्या मुलीचा शोध कोकण रेल्वे पोलिसांनी लावला अाहे. सदर अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव रेल्वे स्थानकावर गस्त घातली जात असताना पोलिसांना ही मुलगी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळून आली. संशय आल्याने पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली असता, ती बिहार राज्यातील असून घरातून पळून आल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधला. वैद्यकीय तपासणीनंतर तिला बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले.