⚠️ हुबळी : पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. नितेश कुमार (३५, मूळ रहिवासी - पटणा, बिहार) असे या आरोपीचे नाव आहे.
🔫 हुबळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेशने पोलीस पथकावर अचानक हल्ला केला. त्याने एक पोलीस वाहनाचीही मोडतोड केली. हवेत गोळी झाडूनही तो थांबला नाही. शेवटी सब-इन्स्पेक्टर अन्नपूर्णा यांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
💔 घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. कर्नाटक सरकारने पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नितेशवर पॉक्सो कायद्यान्वये बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संताप उसळला होता. अनेक नागरिकांनी अशोकनगर पोलीस ठाण्यासमोर जमून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
👧 चिमुरडी निर्जन इमारीतत मृत अवस्थेत सापडली 👧
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कोप्पळ जिल्ह्यातील असून तिची आई हाऊस हेल्पर व ब्युटी पार्लर सहायिका आहे. वडील पेंटर म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी आई तिला कामावर घेऊन गेली होती. दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती तिला घेऊन गेला. शोध घेतल्यानंतर मुलगी जवळच असलेल्या एका निर्जन इमारतीत मृत अवस्थेत सापडली.
🕵️ काय घडले प्रकरणात? 🕵️
- मुलगी सकाळी आईसोबत कामावर गेली असताना झाली होती बेपत्ता.
- मृतदेह जवळच्याच रिकाम्या इमारतीत आढळून आला.
- आरोपीने पोलिसांवर हल्ला करताना पळण्याचा केला प्रयत्न.
- एन्काऊंटरमध्ये पोलिसांकडून आरोपी ठार.