मंगळुरू : २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघे अटकेत

तिघांनी तरुणीला मादक पदार्थ मिसळळेले पेय प्यायला देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 12:54 pm
मंगळुरू : २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघे अटकेत

मंगळुरू : पश्चिम बंगालमधून केरळमध्ये स्थलांतरित झालेल्या २० वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून मंगळुरूत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पीडित तरुणी मूळची पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील असून, ती केरळमधील एका प्लायवुड कारखान्यात काम करत होती. १६ एप्रिल रोजी नोकरीच्या शोधात ती एका पुरुष साथीदारासह मंगळुरू येथे आली. आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान तिचा मोबाईल फोनही खराब झाला. फोन दुरुस्त करण्यासाठी ती मन्नगुड्डा येथील मोबाईल दुकानात गेली, तेव्हा प्रभुराज पुजारी (३८) या ऑटोचालकाने तिच्याशी ओळख वाढवून मदतीचे आमिष दाखवले.

प्रभुराजने तिला नोकरी मिळवून देतो असे सांगत एका निर्जन ठिकाणी नेले, येथे त्याचे दोन साथीदार मिथुन नाईक (३०) आणि मणिकांत (३०) हे उपस्थित होते. या तिघांनी तरुणीला मादक पदार्थ मिसळळेले पेय प्यायला देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. काही वेळाने ती शुद्धीत आली  एका कारमध्ये आरोपींसोबत असल्याचे तिला जाणवले. शुद्धीवर आल्यानंतर तिने आरडाओरडा केला, तेव्हा आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून दिले.

स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून उल्लाल पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असून, तपास सुरू आहे असे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी सांगितले. 



हेही वाचा