प्रत्येक डासाला दिलेय नाव आणि ठेवलाय रक्ताच्या थेंबाचा हिशेब. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
मुंबई : छंद प्रत्येकाला असतात. कोणी कविता करतो, कोणी प्रसिद्ध व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या गोळा करतो, तर कोणी टपाल,नाणी, शिंपले आणि तत्सम गोष्टी गोळा करतो. पण काही व्यक्तींचे छंद पाहून आपसूकच आश्चर्याने तोंडात बोटे जातात. एका मुलीच्या अवली छंदाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काय आहे हा प्रकार ? जाणून घेऊयात सविस्तर!
पहा व्हिडिओ
आकांक्षा रावत नावाची तरुणी सोशल मिडियावर कंटेंट तयार करते. तिने आपल्या लहान बहिणीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आकांक्षाने आपल्या बहिणीचा 'स्लॅमबुक' दाखवला आहे. हा 'स्लॅमबुक' साधासुधा नाही. यात तिच्या बहिणीने मारलेल्या डासांची नोंद आहे. आणि तिने या डासांना नावेही दिली आहेत. मजेशीर बाब म्हणजे, एखाद्या डासाने कधी तिचा चावा घेतला, तसेच त्या डासाला तिने कुठे मारले हे देखील तिने नमूद केले आहे. व्हिडिओत आकांक्षा रावत आपल्या लहान बहिणीच्या सुपीक डोक्याचे कौतुक करताना दिसते.
त्याखाली लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्स देखील केले आहेत. इन्स्टाग्रामवर @aditya_gaphale हा युजर लिहतो 'रक्त फक्त मादी डास सोशून घेते, पण यातील सगळी नावे तर पुरुष मंडळींची आहे ? पुरूषांचे जीवन खरेच कठीण आहे रे बाबा!.' @crimemaster_gogo लिहितो, '...येथे डासांची डेथ सर्टिफिकेट तयार करून मिळेल'. @purvesh_kharad लिहितो,' संपूर्ण डास कम्यूनिटी दहशतीखाली वावरत आहे !, @kunalnotkamra_1 याने 'तू नारी नही पिशाचीनी है !' अशी खोचक टिप्पणी केली आहे. ही रील एकट्या इन्स्टाग्रामवर ५० लाख वेळा पहिली गेली आहे.