गोपनीयतेचे रक्षण करण्याचा सरकारचा सल्ला
नवी दिल्ली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या CERT-In (Indian Computer Emergency Response Team) संस्थेने अॅप्पल डिव्हाइस वापरणाऱ्यांसाठी गंभीर सुरक्षा इशारा जारी केला आहे. iPhone, iPad, Mac, Apple TV आणि Vision Pro सारख्या डिव्हाइसच्या जुन्या सॉफ्टवेअर एडिशनमध्ये सुरक्षेच्या त्रुटी आढळल्याने हॅकर्सकडून डेटा चोरीचा आणि डिव्हाइसवर नियंत्रण मिळवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
CERT-In च्या CIVN-2025-0071 अॅडव्हायझरीनुसार, iOS, macOS, iPadOS, Safari ब्राउझर आणि Apple च्या इतर सॉफ्टवेअर्समध्ये या त्रुटी मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना ताबडतोब सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या त्रुटीमुळे सायबर गुन्हेगार खाजगी व आर्थिक माहिती मिळवू शकतात तसेच डिव्हाइसचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
जुन्या सॉफ्टवेअर एडिशनवर धोका अधिक – iOS / iPadOS 18.4, 17.7.6, 16.7.11, 15.8.4 पेक्षा जुने
– macOS Sequoia 15.4, Sonoma 14.7.5, Ventura 13.7.5 पूर्वीच्या आवृत्त्या
– tvOS 18.4 पूर्वीची आवृत्ती
– visionOS 2.4 पेक्षा जुनी आवृत्ती
काय करावे?
सेटिंग्जमध्ये जाऊन Software Update पर्याय निवडा व डिव्हाइस त्वरित अपडेट करा.