साहित्य
बोनलेस चिकन – १ किलो , १ चमचा आले-लसूण पेस्ट, १०/१५ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, २ चमचे लिंबाचा रस, २ चमचे काळीमिरी पावडर, १ चमचा जिरं पावडर, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा कसूरी मेथी, १ कप क्रीम , १ कप दही, २ अंडी, १ चमचा कॉर्नफ्लोर, चवीनुसार मीठ
कृती
चिकनमध्ये वरील सर्व मिश्रण घालून एकत्रित करावे आणि चिकन ३ ते ४ तास मुरवत ठेवावे किंवा फ्रीज मध्ये रात्रभर ठेवावे.
एका पॅनमध्ये थोडे तेल आणि बटर घालून सर्व चिकनचे तुकडे एक एक करून घालावे. वर झाकण ठेवून मध्यम आंचेवर तपकिरी रंगावर दोन्ही बाजूंनी शालो फ्राय करून घ्यावे. त्यावर चेडार चीज आणि कोथिंबीर घालून सुशोभित करावे. चिंचेचा सॉस किंवा ग्रीन रायत्यासोबत छान लागतात.
चिंचेचा सॉस – चिंचेच्या पल्पमध्ये आवडीनुसार साखर, आले पावडर, मीठ, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, व्हाईट व्हिनेगार घालून १० मिनिटे शिजवा.
ग्रीन रायता- ओली कोथिंबीर, पुदिना,
हिरवी मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ घेऊन त्यात दही घालावे व मिक्सरवर फिरवून घ्यावे.
कविता आमोणकर