गोव्यात तुर्की नागरिकांबाबत रिअल इस्टेट कंपन्यांचा 'मोठा निर्णय', वाचा...

अलिकडच्या काळात तुर्कीने पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य वाढवल्याचे वृत्त आहे

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
गोव्यात तुर्की नागरिकांबाबत रिअल इस्टेट कंपन्यांचा 'मोठा निर्णय', वाचा...

पणजी : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने घेतलेल्या भूमिकेमुळे 'गोवा व्हिलास' या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने गोव्यात तुर्कीच्या नागरिकांना निवासाची सोय नाकारली असल्याची माहिती हाती येतेय. अलिकडच्या काळात तुर्कीने पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य वाढवल्याचे वृत्त आहे.

तुर्की सरकारने पाकिस्तानला युद्धात लष्करी उपकरणे आणि राजनैतिक पाठिंबा देऊ शकते, असा अंदाज देखील विश्लेषकांनी वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात 'गोवा व्हिलास' या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने राज्यात वास्तव्यास असलेल्या तुर्की नागरिकांना  निवासाची सोय नाकारली आहे.

गोवा व्हिला, गो होमस्टे या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी तुर्की नागरिकांना यापुढे सेवा देणार नाही अशी घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, गोवा व्हिलाजने 'भारत आणि पाकिस्तानशी संबंधित तुर्कींनी घेतलेली असहकाराची भूमिका' हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कारण सांगितले आहे. तसेच आम्ही आमच्या देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

भारतातील तुर्की नागरिकांवर कोणतीही अधिकृत बंदी लादण्यात आलेली नसली तरी, खाजगी भारतीय व्यवसायांकडून तुर्की नागरिकांना सेवा देण्यास नकार देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मिळवत आहोत. 

हेही वाचा