गोव्यात मॉक ड्रीलचा प्रयोग यशस्वी
पणजी : पहलगाम येथे हल्ला करून दहशतवाद्यांनी महिलांचा सिंदूर पुसण्याचे पाप केले. मात्र भारताने ऑपरेशन सिंंदूर राबवत सिंंदूर पुसण्याच्या कृत्याचा बदला घेतल्याचे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांनी सांगितले. तसेच देशाच्या इतर भागांंसह गोव्यातही मॉक ड्रीलचा प्रयोग यशस्वी झाल्याचे मुख्यमंंत्र्यांंनी सांंगितले.
ऑपरेशन सिंदूर हे देश वा धर्माविरुद्ध नव्हते. ते दहशतवादाच्या विरोधात होते. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे असल्याने पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचे सिद्ध झाले आहे. सोफिया कुरेशी व विंंग कमांंडर व्योमिका सिंंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व केले.
महिलांंचा सिंंदूर पुसणाऱ्या कृत्याचा महिलांनीच घेतलेला हा बदला आहे. ऑपरेशन सिंंदूरचे नेतृत्व करणाऱ्यात एक मुसलमान अधिकारी आहे. यावरूनच समजते ही कारवाई धर्माविरुद्ध नव्हती, तर दहशतवादाविरोधी होती, असे मुख्यमंंत्री म्हणाले.
गोव्यातील मॉक ड्रिल सक्सेसफूल-
ऑपरेशन सिंंदूर नंंतर देशाच्या इतर भागांंप्रमाणे गोव्यातही मॉक ड्रिल करण्यात आले. गोव्यातील मॉक ड्रिलचा प्रयोग यशस्वी झाला आहे. मांंडवी पूल कोसळला तर कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली जाऊ शकते, दाबोळी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला तर कशा रितीने तोंड देणे आवश्यक आहे, याचे प्रात्यक्षिक झाल्याची माहिती मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांनी दिली.