अर्थरंग : सकाळपासून यूपीआय सेवा ठप्प!

देशभरात लाखो वापरकर्ते आणि व्यापारी अडचणीत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th April, 02:40 pm
अर्थरंग : सकाळपासून यूपीआय सेवा ठप्प!

मुंबई : देशभरात शनिवारी सकाळपासून यूपीआय सेवा ठप्प झाल्याने फोनपे, गूगल पे आणि पे टीएमसारख्या अ‍ॅप्सच्या वापरकर्त्यांना पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडथळ्यामुळे लाखो ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, यूपीआयबाबत दुपारी १ पर्यंत १,१६८ तक्रारी नोंदवल्या गेल्या असून यामध्ये गूगल पे आणि पेटीएमवर सर्वाधिक  वापरकर्त्यांनी अडचणींची नोंद केली आहे.

दरम्यान, एनपीसीआय (नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडून या समस्येवर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यापूर्वीही २६ मार्च रोजी अशाच प्रकारे यूपीआय सेवा २ ते ३ तासांसाठी ठप्प झाली होती. यामुळे व्यवहारात मोठा अडथळा निर्माण झाला होता. यूपीआय सेवा वारंवार ठप्प होण्याच्या घटना सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवरही परिणाम करत असून, वापरकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा