मतभेद नाहीत, मगो- भाजप संबंध सौहार्दाचे : सुदिन ढवळीकर

कोणीच दिशाभूल केली नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 04:26 pm
मतभेद नाहीत, मगो- भाजप संबंध सौहार्दाचे : सुदिन ढवळीकर

पणजी : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरात चर्चा असतानाच दिल्ली भेटीनंतर मगो - भाजप संबंध सौहार्दाचे असल्याचे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. युतीबाबत जो संदेश 'मगो'ने भाजपच्या केंद्रीय नेत्यांना दिला आहे, त्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्याचेही वीज मंत्री सुदिन ढवळीकर यानी सांगितले. तर युतीबाबत कोणीच माझी दिशाभूल केली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

प्रियोळबाबत भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळ येथील मेळाव्यात केले होते. यानंतर भाजपला मगोची गरज नाही, असे वक्तव्य कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यानी केले होते.

या घटनेनंतर मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेउन चर्चा केली. मगो व भाजपमध्ये मतभेद असून मगो चे मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली होती. मात्र मगो व भाजपमध्ये मतभेद नसून चांगले संबंध असल्याचे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यानी सांगितले. दिल्ली भेटीतील संदेशाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. मगो - भाजप युतीबाबत बोलताना कोण कशाला माझी दिशाभूल करेल? एवढेच वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी केले.

हेही वाचा