कोमुनिदादींसाठी मिळणार पूर्णवेळ प्रशासक, कर्मचाऱ्यांचीही होणार भरती

लवकरच कोमुनिदादींचे संगणकीकरणही होणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 04:22 pm
कोमुनिदादींसाठी मिळणार पूर्णवेळ प्रशासक, कर्मचाऱ्यांचीही होणार भरती

पणजी : कोमुनिदादींचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी पूर्णवेळ प्रशासकासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती लवकरच होणार आहे. तसेच कोमुनिदादींचे संगणकीकरण करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात कोमुनिदाद समितीचे अध्यक्ष तसेच इतर सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

कोमुनिदादीच्या समस्या मांडण्याच्या हेतूने ते मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी आले होते. अपुरा कर्मचारी वर्ग तसेच साधनसुविधांचा अभाव, अशा समस्या कोमुनिदाद सदस्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडल्या.

कोमुनिदादींसाठी पूर्णवेळ प्रशासकाची गरज आहे. कोमुनिदाद प्रशासकाकडे इतर खात्याचा ताबा असतो. दैनंदिन कागदपत्रे तसेच कामकाज पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही गरज असते. कोमुनिदादींसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कोमुनिदादींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी संगणकीकरण होण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने संगणक, प्रिंटर तसेच इतर आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात येईल. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटरची नेमणूक केली जाईल. या सर्व सोयींमुळे कागदपत्रे व इतर तपशील सुरक्षित ठेवणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

हेही वाचा