मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पणजीत मेळावा; उत्तम प्रतिसाद
मेळाव्यात बोलताना निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर. सोबत इतर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मराठी राजभाषेसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी सर्व मतदारसंंघांत ‘वोट बँक’ तयार करण्यात येणार असून सर्व तालुक्यांत बैठका होणार आहेत. कोकणीला विरोध नसला तरी मराठीवरील अन्याय मराठीप्रेमी सहन करणार नाहीत. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार मराठीप्रेमींच्या मेळाव्यात करण्यात आला.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांंझा सभागृहात मराठीप्रेमींचा मेळावा झाला. प्रा. सुभाष वेलिंंगकर हे या मेळाव्याचे निमंंत्रक होते. मेळाव्यात गो. रा. ढवळीकर, प्रदीप घाडी आमोणकर, नेहा उपाध्ये, प्रा. गजानन मांंद्रेकर, सागर जावडेकर, डॉ. अनुजा जोशी, तुषार टोपले यांंचीही भाषणे झाली. प्रा. सुभाष वेलिंंगकर यांनी मराठीप्रेमींना प्रतिज्ञा दिली.
गोव्याला मराठीचा २,५०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. १९८७ साली राजभाषेसाठी आंदोलन झाले होते. हिंंसाचार व अल्पसंंख्याकवाद हे मुद्दे प्रभावी ठरल्याने कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणे हा तिचा न्याय हक्क आहे. हा हक्क मिळविण्यासाठी मराठीप्रेमींनी संंघटीतपणे लढा द्यायला हवा. मराठीसाठीचा लढा हा गोमंतकाच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंंगकर यांनी केले.
पणजीत आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याला उपस्थित मराठीप्रेमी.
गो. रा. ढवळीकर यानी यापूर्वीच्या लढ्याचा आढावा घेत आत्मस्वर असलेल्या भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. मराठी राजभाषेच्या मागणीसाठी लढा सुरूच राहणार आहे, असे प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले. आजची तरुण पिढी इंंग्रजाळलेली असली तरी तिला एकही भाषा नीट येत नाही. संंस्कृती, अस्मिता जपण्यासाठी मराठीला राजभाषेचा दर्जा आवश्यक आहे, असे नेहा उपाध्ये म्हणाल्या.
डॉ. अनुजा जोशी, प्रा. गजानन मांंद्रेकर, तुषार टोपले, सागर जावडेकर यांनी मराठीसाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली. मच्छींद्र चारी यानी सूत्रसंचालन केले. गुरुदास सावळ यानी स्वागत केले. प्रकाश भगत यांनी आभार मानले. पौर्णिमा केरकर यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.
गोव्याची संंस्कृती मराठी आहे : गो. रा. ढवळीकर
गोमंतकीय कोकणी बोलत असले तरी त्यांंची भाषा मराठी आहे. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यानी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. भाजपच्या म्हापसा येथील अधिवेशनात मराठी राजभाषेचा ठराव संंमत झाला होता. आज मात्र मराठीला दुय्यम स्थान दिले जात आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत कोकणीसाठी गुणांची तरतूद करण्यात आली आहे. गोव्याची संंस्कृती कोकणी नसून ती मराठी आहे, असे गो. रा. ढवळीकर म्हणाले.