उदय मडकईकरांच्या पुत्राला जीम मालकाने ठेवले डांबून

लॉक करून बाहेर बाऊन्सर ठेवल्याने सांतइनेजमध्ये खळबळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 12:34 am
उदय मडकईकरांच्या पुत्राला जीम मालकाने ठेवले डांबून

पणजी : माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांच्या पुत्राला बासिलो जीममध्ये डांबून ठेवून मालकाने बाहेर बाऊन्सर उभे केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत उदय मडकईकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व बाऊन्सरवर एफआरआर दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या मा​हितीनुसार, उदय मडकईकर यांचा पुत्र अध्वय मडकईकर गेल्या काही वर्षांपासून सांतइनेज-पणजी येथील बासिलो जीम चालवत आहे. जीम मालक आणि मडकईकर यांच्यात झालेल्या करारानुसार जीम चालवणाऱ्याने तीन महिन्यांचे भाडे थकवले तरच त्याला तेथून काढण्याचा अधिकार मालकाला आहे. मडकईकर यांनी आतापर्यंतचे सर्व भाडे भरलेले असतानाही जीम मालकाने अध्वय मडकईकरला आत डांबत जीमला लॉक केले आणि बाहेर बाऊन्सर उभे केले. या प्रकरणी उदय मडकईकर यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सर्व बाऊन्सवर एफआयआर दाखल केला असून, याप्रकरणी​ पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा