फोंडा पोलीस स्थानकात एफआयआर नोंद
फोंडा : बोरी, केपे भागात कोट्यवधी रुपयांची आपल्या कुटुंबाची मालकीची २.६० लाख चौ.मी. जमीन खोटी कागदपत्रे बनवून विकल्याची तक्रार आल्तिनो पणजी येथील वासुदेव प्रेमानंद बोरकर आणि तिची आई विमल बोलकर यांनी आठ जणांविरोधात फोंडा पोलिसांत केली. संबंधितांना त्यांनी अटक करण्याची मागणी केली.
बनावट जमीन हडप प्रकरणात फोंडा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जमीन हडप करण्यासाठी खोटे उत्तराधिकार दस्तऐवज, विक्री पत्रे यासारखी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. विकलेली जमीन तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तथापि, मुख्य आरोपीने जमीन हडप करण्यासाठी खोटे कागदपत्रे तयार केली. हा घोटाळा २०१५ मध्ये झाला होता, हे उघड झाले आहे.
विकलेल्या मालमत्तेत अनेक घरे आणि बंगले बांधले गेले होते, ज्यामध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि बनावट कागदपत्रांसाठी त्यांना अटक करावी, असे तक्रारदार वासुदेव बोरकर यांनी सांगितले. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही आणि त्यांना राजकीय वारदहस्त आहे. त्यापैकी एक माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहे, असे ते म्हणाले.
वाद कौटुंबिक स्वरुपाचा
पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रे बनवलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांना अटक केली जाईल. कौटुंबिक वाद हा दिवाणी स्वरूपाचा होता आणि दिवाणी न्यायालयात दाव्याद्वारे जमीन परत मिळवता येते.