एसबीआय लिपिक पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी..

मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र ०१ एप्रिल रोजी जारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd April, 10:15 am
एसबीआय लिपिक पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी..

मुंबई:  एसबीआय लिपिक पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र ०१ एप्रिल रोजी जारी करण्यात आले आहे. प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच sbi.co.in वर जारी करण्यात आले आहे.

प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवारांना ते डाउनलोड करावे लागणार आहे. या प्रवेशपत्राची प्रिंटआउट घेऊनच परीक्षेत सहभागी होता येणार आहे.  उमेदवारांना हॉल तिकीटाशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही.

१० आणि १२ एप्रिल रोजी एसबीआय लिपिक मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या अचूक तारखा उमेदवार त्यांचे हॉल तिकीट जारी झाल्यावर तपासू शकतील. ही परीक्षा देशभरात आयोजित केली जाईल. या परीक्षेत जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रीजनिंग ॲबिलिटी आणि कंप्युटर ॲप्टिट्यूड यासह इतर विभागांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.


हेही वाचा