अवघ्या ७ महिलांनाच मिळाले इंडियन एक्स्प्रेसच्या यादीत मानाचे स्थान.
मुंबई : इंडियन एक्सप्रेसने २०२५ च्या भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या यादीत असलेल्या प्रभावशाली नावांनी यंदादेखील आपली मोहोर उठवलेली दिसत आहे, तर काही नवीन चेहऱ्यांनी देखील या यादीत शिरकाव केलाय. सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे स्थान कायम आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या यादीत स्थान मिळवले आहे. तसेच राहुल गांधी, योगी आदित्यनाथ यांनी देखील स्थान पटकावले आहे.
या यादीत पहिल्यांदाच पॉवर स्टार पवन कल्याण, पुष्पा फेम अल्लू अर्जुन, तमिळ अभिनेता थलपती विजय आणि बॉलिवूड अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांनी प्रवेश केलाय. यादीत विविध क्षेत्रांत प्रभावी योगदान देणाऱ्या दिग्गज राजकारणी,अभिनेता, खेळाडू आणि उद्योजक यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी पहा.
इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये प्रथम स्थान दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जयशंकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि मोहन भागवत चौथ्या क्रमांकावर आहेत. निर्मला सितारामन पाचव्या आणि योगी आदित्य नाथ सहाव्या क्रमांकावर आहेत. राजनाथ सातव्या क्रमांकावर आहेत. अश्विनी वैष्णव आठव्या स्थानावर आहेत. पण राहुल गांधी नवव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर आहेत आणि गौतम अदानी ११ व्या क्रमांकावर आहेत. पियुष गोयल १२ व्या क्रमांकावर आणि देवेंद्र फडणवीस १३ व्या क्रमांकावर आहेत. १४व्या क्रमांकावर चंद्रा बाबू आहेत आणि त्यानंतर नितीन गडकरी येतात.
विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवले असून ते ६३व्या क्रमांकावर आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ६५वा क्रमांक पटकावला आहे. प्रियांका गांधी ८१ व्या क्रमांकावर आहेत, त्यानंतर शशी थरूर आहेत. सिने अभिनेता शाहरुख खान ९७ व्या क्रमांकावर आहे. दिलजीत दोसांझ ९८ व्या क्रमांकावर आहे आणि अमिताभ बच्चन ९९व्या क्रमांकावर आहेत. तर अभिनेत्री आलिया भट १०० व्या क्रमांकावर आहे.
यादीत केवळ सात महिलांचा समावेश
दरम्यान सोशल मिडियावर, या यादीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण मान्यवरांचे काउत्क करत आहेत पण बरेच लोक या यादीतला फोलपणा देखील मांडत उघडपणे नाराजी वेकट करत आहेत. सर्वाना तोचणारी बाब म्हणजे या यादीत केवळ सात महिलांनाच स्थान देण्यात आले आहे. बहुतांश भाग हा राजकारण्यांनी व्यापला आहे. पण साहित्यिक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ यांची वानवा जाणवतेय.
१. नरेंद्र मोदी, ७४ – भारताचे पंतप्रधान
गेल्या वर्षीचा क्रमांक: १
२. अमित शहा, वय ६०- केंद्रीय गृहमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: २
३. एस जयशंकर, वय ७०- केंद्रीय परराष्ट्र मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५
४ . मोहन भागवत, ७४- आरएसएस सरसंघचालक
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३
५. निर्मला सीतारामन, वय ६५ - केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८
६. योगी आदित्यनाथ, ५२- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६
७. राजनाथ सिंह, ७३ - केंद्रीय संरक्षण मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७
८. अश्विनी वैष्णव, ५४ - केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: १३
९. राहुल गांधी, ५४- विरोधी पक्षनेते, लोकसभा
गेल्या वर्षीचा क्रमांक: १६
१०. मुकेश अंबानी, ६७ – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
गेल्या वर्षीचा क्रमांक: ११
११. गौतम अदानी, वय ६२- अध्यक्ष, अदानी ग्रुप
गेल्या वर्षीचा क्रमांक: १०
१२. पियुष गोयल, वय ६० - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: १२
१३. देवेंद्र फडणवीस, ५४- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५०
१४. एन. चंद्राबाबू नायडू, ७४ - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
नवीन
१५. नितीन गडकरी, वय ६७ - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
नवीन
१६. संजय मल्होत्रा, वय ५७ - आरबीआय गव्हर्नर
नवीन
१७. भूपेंद्र यादव, वय ५५ - केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३१
१८. ममता बॅनर्जी, ७०- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख
गेल्या वर्षीचा क्रमांक: १५
१९ . हरदीप सिंग पुरी, वय ७३ - केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: २०
२०. सिद्धरामय्या , ७६- कर्नाटकचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: २२
२१. नितीश कुमार, ७४- बिहारचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: २४
२२. धर्मेंद्र प्रधान, ५५- केंद्रीय शिक्षण मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३३
२३ . एमके स्टॅलिन, 72- तामिळनाडूचे मुख्यमंत्री, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) प्रमुख
गेल्या वर्षीचा क्रमांक: २५
२४. जय शाह, वय ३६- अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३५
२५. एन चंद्रशेखरन, वय ६१- अध्यक्ष, टाटा ग्रुप
गेल्या वर्षीचा क्रमांक: २८
२६. नीता अंबानी, वय ६०- संस्थापक आणि अध्यक्षा, रिलायन्स फाउंडेशन
गेल्या वर्षीचा क्रमांक: २६
२७. जनरल उपेंद्र द्विवेदी, ६० - लष्करप्रमुख
नवीन
२८. अनुमुला रेवंत रेड्डी, ५५- तेलंगणाचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३९
२९ . शिवराज सिंह चौहान, वय ६६ - केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
नवीन
३०. नोएल नवल टाटा, वय ६८- अध्यक्ष, टाटा ट्रस्ट्स, ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन
नवीन
३१ . हिमंता बिस्वा सरमा, 56- आसामचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: १४
३२ . पुष्कर सिंग धामी, ४९ – उत्तराखंडचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६१
३३ . मल्लिकार्जुन खर्गे, 82- अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस; विरोधी पक्षनेते, राज्यसभा
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३६
३४. मनसुख मांडवीय, ५२ - केंद्रीय कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: २३
३५. अजित डोभाल, ८०- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
गेल्या वर्षीचा क्रमांक: १७
३६. विश्वनाथन आनंद, ५५- बुद्धिबळ ग्रँडमास्टर
नवीन
३७ .उदय कोटक, वय ६६ - संस्थापक आणि संचालक, कोटक महिंद्रा बँक
गेल्या वर्षीचा क्रमांक: ४१
३८ .नायब सिंग सैनी, ५५
हरियाणाचे मुख्यमंत्री
नवीन
३९ .मनोहर लाल खट्टर, ७०
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८२
४० .हेमंत सोरेन, ४९
मुख्यमंत्री, झारखंड
गेल्या वर्षीचा क्रमांक: ९३
४१ .पिनारायी विजयन, ७९
केरळचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ४९
४२ .बीएल संतोष, ५८
राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन), भाजप
नवीन
४३. शक्तिकांत दास, ६८
पंतप्रधानांचे प्रधान सचिव
गेल्या वर्षीचा क्रमांक: १९
४४. भगवंत मान, ५१
पंजाबचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६४
४५. संजीव खन्ना, ६४
भारताचे सरन्यायाधीश
गेल्या वर्षीचा क्रमांक: २१
४६. उमर अब्दुल्ला, ५५
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री
नवीन
४७. दीपिंदर गोयल, ४२
झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ
नवीन
४८. रोहित शर्मा, ३७
कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६८
४९ . राजीव बजाज, ५८
व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो
गेल्या वर्षीचा क्रमांक: ४४
५०. जेपी नड्डा, ६४
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ९
५१. एकनाथ शिंदे, ६१
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेना अध्यक्ष
गेल्या वर्षीचा क्रमांक: ४८
५२. अरविंद केजरीवाल, ५६
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री; राष्ट्रीय संयोजक, आम आदमी पक्ष
गेल्या वर्षीचा क्रमांक: १८
५३. तुषार मेहता, ६०
भारताचे सॉलिसिटर जनरल
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५१
५४ . राजीव रंजन (लालन) सिंग, ७०
केंद्रीय पंचायती राज; मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
नवीन
५५. सर्वानंद सोनोवाल, ६२
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
नवीन
५६. ज्योतिरादित्य सिंधिया, ५४
केंद्रीय दळणवळण मंत्री; ईशान्य प्रदेश विकास
नवीन
५७. अजित पवार, ६५
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७६
५८. किरेन रिजिजू, ५३
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री
नवीन
५९. चिराग पासवान, ४२
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
नवीन
६०. सीआर पाटील, ७०
केंद्रीय जलशक्ती मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६७
६१. पेमा खांडू, ४५
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
नवीन
६२. विष्णू देव साई, ६१
छत्तीसगडचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७७
६३. प्रमोद सावंत, ५१
गोव्याचे मुख्यमंत्री
नवीन
६४. भूपेंद्र पटेल, ६२
गुजरातचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७१
६५. .रेखा गुप्ता, ५०
दिल्लीचे मुख्यमंत्री
नवीन
६६. मोहन यादव, ६०
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५५
६७. भजनलाल शर्मा, ५८
राजस्थानचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७४
६८. सुनील भारती मित्तल, ६७
अध्यक्ष, भारती एंटरप्रायझेस
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८८
६९. डॉ. प्रताप सी रेड्डी, ९२
अपोलो हॉस्पिटल्सचे संस्थापक-अध्यक्ष
नवीन
७०. अरविंद श्रीनिवास, ३०
सह-संस्थापक आणि सीईओ, पर्प्लेक्सिटी
नवीन
७१. अजय कुमार भल्ला, ६४
मणिपूरचे राज्यपाल
नवीन
७२. विराट कोहली, ३६
क्रिकेटपटू
गेल्या वर्षीचा क्रमांक: ३८
७३. कोनिडेला पवन कल्याण, ५३
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री; अभिनेता
नवीन
७४. विजय , ५०
तमिळ सुपरस्टार, संस्थापक, तमिलगा वेत्री कळघम
नवीन
७५. टीव्ही सोमनाथन, ५९
कॅबिनेट सचिव, भारत सरकार
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६६
७६. निखिल कामथ, ३८
सह-संस्थापक आणि सीएफओ, झेरोधा
नवीन
७७. शरद पवार, ८४
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
गेल्या वर्षीचा क्रमांक: ९४
७८. पीके मिश्रा, ७६
पंतप्रधानांचे प्रधान सचिव
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५२
७९ . मनोज सिन्हा, ६५
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५३
८०. किरण नाडर, ७४
किरण नादर कला संग्रहालयाचे संस्थापक
गेल्या वर्षीचा क्रमांक: ५७
८१. प्रियंका गांधी वाड्रा, ५३
काँग्रेस खासदार, वायनाड
गेल्या वर्षीचा क्रमांक: ६२
८२. शशी थरूर, ६९
तिरुवनंतपुरम येथील काँग्रेसचे खासदार
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८४
८३. जसप्रीत बुमराह, ३१
क्रिकेटपटू
नवीन
८४. तुहिन कांता पांडे, ५९ वर्षांचे
अध्यक्ष, सेबी
नवीन
८५. डीके शिवकुमार, ६२
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७२
८६. तेजस्वी यादव, ३५ वर्षीय
बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७३
८७. अखिलेश यादव, ५१
अध्यक्ष, समाजवादी पक्ष
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७५
८८. गजेंद्रसिंग शेखावत, 57
केंद्रीय संस्कृती, पर्यटन मंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७०
८९. असदुद्दीन ओवैसी, ५५
अध्यक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७८
९०. एचडी कुमारस्वामी, ६५
केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री
नवीन
९१. कुमार मंगलम बिर्ला, ५७
अध्यक्ष, आदित्य बिर्ला ग्रुप
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८५
९२. अल्लू अर्जुन, ४२
अभिनेता
नवीन
९३. रामदेव, ५९
योग गुरु, पतंजली योगपीठ
गेल्या वर्षीचा क्रमांक: ८६
९४. सुखविंदर सिंग सुखू, 61
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
गेल्या वर्षीचा क्रमांक: ९०
९५. व्ही. नारायणन, ६०
अध्यक्ष, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
नवीन
९६. करण जोहर, ५२
चित्रपट निर्माते, निर्माता
गेल्या वर्षीचा क्रमांक: ९७
९७. शाहरुख खान, ५९ वर्षांचा
अभिनेता, निर्माता, उद्योजक
गेल्या वर्षीचा क्रमांक: २७
९८. दिलजीत दोसांझ, ४१
अभिनेता, पॉपस्टार
नवीन
९९. अमिताभ बच्चन, ८२
अभिनेता
गेल्या वर्षी रँक: ९९
१००. आलिया भट्ट, ३२
अभिनेत्री, निर्माता
गेल्या वर्षीचा क्रमांक: ७९