पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक सचिवपदाची धुरा सांभाळणाऱ्या 'निधी तिवारीं' ची 'अशी' आहे कारकिर्द

वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या निधी तिवारी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st April, 10:33 am
पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक सचिवपदाची धुरा सांभाळणाऱ्या 'निधी तिवारीं' ची 'अशी' आहे कारकिर्द

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या निधी तिवारी यांची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करणाऱ्या निधी तिवारींविषयी काही महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी-

आत्तापर्यंत पार पाडलेल्या जबाबदाऱ्या:-
वाराणसी येथे राहणाऱ्या २०१४ च्या बॅचच्या भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी निधी तिवारी यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. तसेच त्यांची नियुक्ती तत्काळ करण्यात आली आहे.

निधी तिवारी या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. नोकरी करता करता त्या यूपीएससीची तयारी देखील करत होत्या. त्यामध्ये यशवी झाल्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवा (आयएफएस) मध्ये काम सुरू केले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले. उपसचिव म्हणून कार्यरत असताना आयएफएस निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात (एमईए) निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागातही काम केले आहे.

निधी यांच्या कामाचे स्वरूप कसे असेल?
निधी तिवारी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांचे समन्वय साधतील, बैठका आयोजित करतील आणि सरकारी विभागांच्या कामकाजात समन्वय साधतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, निधीला मॅट्रिक्स लेव्हल १२ नुसार पगार मिळेल.

हेही वाचा