प्रियकरासोबत पकडले गेल्यानंतर दिली पतीला धमकी; म्हणाली- 'तुला आता ड्रममध्येच भरते.. !'
गोंडा : उत्तर प्रदेशातील मेरठमधील ड्रम प्रकरणानंतर युपीमधूनच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गोंडा येथे पतीशी झालेल्या भांडणानंतर पत्नीने भयानक रूप धारण केले. पतीने आपल्या पत्नीला तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत विचारणा केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून महिलेने तिच्या पतीला धमकी दिली. म्हणाली 'जास्त वळवळ केली तर तुलाही आता ड्रममध्ये भरून टाकीन'. पत्नीच्या धमक्यांनी नवरा प्रचंड घाबरला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर विरोधी तक्रार पोलिसांकडे केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पती-पत्नीमधील वादाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या...
नेमके प्रकरण काय ?
गोंडा जल निगमचे कनिष्ठ अभियंता (जेई) धर्मेंद्र कुशवाह यांचे २०१६ मध्ये बस्ती येथील माया मौर्य यांच्याशी लग्न झाले होते. दोघांचा प्रेमविवाह होता. मुलीच्या जन्मानंतर, धर्मेंद्रने आपल्या पत्नीच्या नावावर तीन चारचाकी गाड्या खरेदी केल्या आणि त्याचे हप्ते भरत राहिले. धर्मेंद्र यांनी २०२२ मध्ये मायाच्या नावावर जमीन खरेदी केली आणि घर बांधणीचे कंत्राट त्यांचे नातेवाईक नीरज मौर्य यांना दिले. दरम्यान, माया आणि नीरज मौर्य यांची जवळीक वाढली. कोविड-१९ दुसऱ्या लहरीच्या काळात नीरजच्या पत्नीचे निधन झाले होते. यानंतर नीरज आणि माया यांच्यातील नाते अधिकच घट्ट झाले.
दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी धर्मेंद्र यांनी आपली पत्नी आणि नीरजला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. धर्मेंद्रने विरोध केला तेव्हा माया आणि तिच्या प्रियकराने त्यांना जबर मारहाण केली. भांडणानंतर, माया घराबाहेर पडली. २५ ऑगस्ट २०२४ रोजी, माया नीरजसोबत पुन्हा धर्मेंद्रच्या घरी परतली. तिने जबरदस्तीने घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि लाखों रुपये घेऊन पळून गेली. हा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला. दरम्यान धर्मेंद्रने पोलिसांकडे तक्रार केली. पण काही ठोस असे झाले नाही.
दरम्यान परवा २९ मार्च रोजी, पुन्हा हे प्रकरण उफाळून आले. २९ मार्च २०२५ रोजी मायाने धर्मेंद्र आणि त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. विरोध केला तेव्हा तिचा प्रियकर नीरजने मायासोबत मिळून धर्मेंद्र व त्यांच्या आईला जबर मारहाण केली. दोघांनी धर्मेंद्रला वायपरने मारहाण केल्याचा व्हिडिओही आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पुन्हा हेही प्रकरण पोलिसांत पोहोचले. येथे मायाने तिच्या पतीविरुद्ध खोटे आरोप केल्याची तक्रारही केली आहे.
धर्मेंद्र तिला त्रास देत होता असे, मायाने पोलिसांना सांगितले. त्याने तिला चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले आहे अशी देखील तिची तक्रार आहे. जुलै २०२४ मध्ये धर्मेंद्रने तिच्यावर हल्ला केला, त्यानंतर तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर धर्मेंद्रने घटस्फोटाचा खटला दाखल केला आणि तिला घराबाहेर हाकलून लावले, असेही तिच्या तक्रारीत मायाने म्हटले आहे.
मागेच उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर येथील एका पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आणि क्षणात ही गोष्ट सगळीकडे व्हायरल झाली. पंच आणि गावकऱ्यांसमोर झालेला हा विवाह अजूनही चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, तीने खुलासा केला की मेरठच्या सौरभ हत्याकांडामुळे तो खूप घाबरला होता.
दरम्यान, मेरठ आणि औरैयामध्ये दोन भयानक घटना उघडकीस आल्या. मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या प्रियकरासह पती सौरभची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर, शरीर एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंटचे द्रावण देखील ओतण्यात आले. त्याचप्रमाणे, औरैयामध्ये, लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनी, प्रगती यादवने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एका मारेकऱ्याला कंत्राट देऊन तिच्या पतीची हत्या केली. काहीही असो प्रेमाच्या त्रिकोणामुळे सुखी संसाराची भूमिती मात्र बिघडत असल्याची उदाहरणे, गेल्या काही काळापासून समोर येत आहे.