जिज्ञासा : सुमारे अडीजशे वर्षांपूर्वी उघडले देशातील पहिले मॉडर्न पोस्ट ऑफिस

जाणून घ्या तेव्हा पासून सुरू झालेला टपाल खात्याचा आज पर्यंतचा प्रवास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st March, 10:35 am
जिज्ञासा : सुमारे अडीजशे वर्षांपूर्वी उघडले देशातील पहिले मॉडर्न पोस्ट ऑफिस

मुंबई : केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडिया पोस्टसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. ३१ मार्च ही तारीख केवळ भारतीय पोस्टसाठीच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाची आहे. सुमारे २५१ वर्षांपूर्वी याच दिवशी देशातील पहिले पोस्ट ऑफिस (GPO) स्थापन झाले होते.

देशातील पहिले मॉडर्न पोस्ट ऑफिस ३१ मार्च १७७४ रोजी कलकत्ता (कोलकाता) येथे उघडण्यात आले. देशातील दुसरे पोस्ट ऑफिस १ जून १७८६ रोजी मद्रास (चेन्नई) येथे आणि नंतर १७९४ मध्ये बॉम्बे (मुंबई) येथे उघडण्यात आले. भारतात पोस्टल सेवा सुरू करण्याची तयारी १७६६ मध्ये सुरू झाली. ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन सर्वेसर्वा रॉबर्ट क्लाइव्हने ही पोस्टल व्यवस्था स्थापन केली. त्यानंतर लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्जने १७७४ मध्ये पोस्ट ऑफिसची अधिकृत स्थापना केली. वॉरेन हेस्टिंग्ज हे बंगाल प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल होते, त्यांनी १७७२ ते १७८५ पर्यंत हे पद भूषवले.

१६७२ मध्ये म्हैसूर अँचेची स्थापना 

इंडियन पोस्टनुसार, १२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत दोन प्रकारच्या टपाल सेवा पुरवल्या जात होत्या. त्या काळात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे किंवा लोक पायी जात असत. शेरशाहने १५४१ मध्ये बंगाल आणि सिंध दरम्यान २००० मैलांच्या पट्ट्यावर घोड्याची बग्गी सुरू केली. त्यानंतर म्हैसूर राज्याचे १४ वे सम्राट, महाराजा चिक्का देवराज वाडियार यांनी १६७२ मध्ये टपाल सेवांसाठी म्हैसूर अँचेची स्थापना केली. महाराजा चिक्का देवराज यांना भारतातील टपाल सेवांचे संस्थापक या दृष्टीने पाहिले जाऊ शकते, कारण त्यांनी ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या त्याच प्रणालीचे अपग्रेड करून एक संघटित भारतीय टपाल सेवा सुरू केल्या. 

१८७९ साली पहिले पोस्टकार्ड सादर करण्यात आले

१८७४ मध्ये देशातील पहिले पोस्ट ऑफिस स्थापन झाल्यानंतर १८५० मध्ये पोस्ट ऑफिस कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर १८५४ मध्ये पोस्ट ऑफिस कायदा XVII लागू करण्यात आला. १८७३ मध्ये देशात पहिल्यांदाच एम्बॉस्ड पोस्टल लिफाफ्यांची विक्री सुरू झाली आणि फक्त ३ वर्षांनंतर, म्हणजे १८७६ मध्ये, आपला देश युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये सामील झाला. १८७९ मध्ये पोस्टकार्ड सुरू करण्यात आले आणि १८८० मध्ये रेल्वेद्वारे टपाल सेवा सुरू झाली आणि त्याच वर्षी मनी ऑर्डर देखील सुरू करण्यात आल्या. आज तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये बँकिंग सेवांचा लाभ घेत आहात त्या पोस्ट ऑफिसमधील बँकिंग सेवा १८८२ मध्ये सुरू झाल्या होत्या. १८८२ मध्ये, इंडिया पोस्टने बचत खाती उघडण्यास सुरुवात केली.

स्पीड पोस्ट १ ऑगस्ट १९८६ रोजी सुरू करण्यात आली 

१८८४ मध्ये, भारतीय पोस्टाने जीवन विमा सुरू केला आणि १८८६ मध्ये, एक आण्याच्या महसूल तिकिटाची (रेव्हेन्यू स्टॅम्प) विक्री सुरू झाली. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा हा १ जुलै १८९८ रोजी लागू झाला आणि त्याच वर्षी २५ डिसेंबर रोजी इम्पीरियल पेनी पोस्टेज सुरू करण्यात आले. ज्या वर्षी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी भारतीय टपाल खात्याने स्वातंत्र्यदिनी ३ टपाल तिकिटे जारी केली. सामान्य टपाल सेवांच्या तुलनेत खूपच कमी वेळेत टपाल सेवा प्रदान करण्यासाठी १ ऑगस्ट १९८६ रोजी स्पीड पोस्ट सुरू करण्यात आली. जसजसा काळ पुढे गेला तसतसे इंडिया पोस्टने त्यांच्या सेवा सतत अपग्रेड केल्या. या क्रमाने, २५ जून २००६ रोजी ई-पेमेंट सेवा सुरू करण्यात आल्या.

तुम्हाला हे माहीत आहे का ? 

पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा जास्त व्याज देतात ! 

आजच्या काळात, भारतीय पोस्ट फक्त साध्या बचत खात्यांद्वारे पोस्टल सेवा पुरवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतीय पोस्ट आता देशातील नागरिकांना बँकिंग सुविधा देखील पुरवते.  इंडिया पोस्ट आपल्या ग्राहकांसाठी बचत खाती तसेच आवर्ती ठेव (RD) खाती, वेळ ठेव (TD) खाती उघडते. एवढेच नाही तर, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी किसान विकास पत्र (KVP) सारख्या विविध लघु बचत योजना देखील चालवते. यामध्ये तुमचे पैसे ११५ महिन्यांत दुप्पट होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टपाल सेवांसाठी सुरू झालेली इंडिया पोस्ट आज आपल्या ग्राहकांना अनेक बचत योजनांवर मोठ्या बँकांपेक्षाही जास्त व्याज देते.


हेही वाचा