मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

नायिका बनवण्याचे आमिष दाखवत झाशीतील मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st April, 01:16 pm
मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

दिल्ली : २०२५ च्या महाकुंभ दरम्यान व्हायरल झालेल्या 'मोनालिसा' या मुलीला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने सनोजचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सनोजवर झाशीतील एका अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आणि तिला धमकावण्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ मार्च २०२४ रोजी, सनोज मिश्रा या दिग्दर्शकाविरुद्ध तक्रारदार मुलीने मध्य दिल्लीतील नबी करीम पोलीस ठाण्यात बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमकी देणे यासारख्या गुन्ह्यांखाली एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर, ३० मार्च रोजी मिश्राला गाझियाबाद येथून अटक करण्यात आली.

घटनेची पार्श्वभूमी अशी :-
पीडितेकडून समोर आलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये तिची टिकटॉक आणि इंस्टाग्रामद्वारे सनोज मिश्राशी ओळख झाली. त्यावेळी ती झाशी येथे राहत होती. काही दिवस गप्पा आणि थोडी माहिती मिळवल्यानंतर १७ जून २०२१ रोजी, सनोजने तिला फोन केला आणि तिला झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यास सांगितले.

सामाजिक दबावामुळे पीडितेने त्याला भेटण्यास नकार दिला, परंतु सनोजने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ जून २०२१ रोजी, सनोजने तिला पुन्हा रेल्वे स्टेशनवर बोलावले, तिला जीवे मारण्याची धमकी देत तिला एका रिसॉर्टमध्ये नेले. तिथे त्याने तिला ड्रग्ज पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सनोजने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले असून तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. फेब्रुवारी २०२५ मध्ये, सनोजने तिला सोडून दिले आणि तक्रार केल्यास तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 

हेही वाचा