सोशल मीडियावर धमाका करणारं 'घिबली आर्ट' नक्की आहे तरी काय?

चॅट जीपीटीच्या नव्या फिचरचं युवा वर्गाला वेड

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st April, 09:59 am
सोशल मीडियावर धमाका करणारं 'घिबली आर्ट' नक्की आहे तरी काय?

पणजी : सध्या सोशल मीडियावर कार्टूनसारखे दिसणारे फोटो 'घिबली आर्ट' किंवा 'घिबली इमेज' म्हणून व्हायरल होत आहेत. चॅट जीपीटीच्या नवीन फिचरचा वापर करून नेटकरी मोठ्या प्रमाणात फोटो तयार करताना दिसत आहेत. या ट्रेंडने लोकांना अक्षरश: वेड लावले असून चॅट जीपीटीच्या या फीचरने राजकारण्यांनाही भुरळ पाडली आहे.  
यूजर्स त्यांचा कोणताही आवडता फोटो, चित्रपटातील फोटो किंवा कोणत्याही लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिबलीच्या फोटोमध्ये रूपांतरित करू शकतात. या फीचरचा वापर करत यूजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे.

'घिबली आर्ट'म्हणजे काय?
स्टुडिओ घिबली ही जपानच्या टोकियोतील एक प्रसिद्ध ऍनिमेशन कंपनी आहे. घिबली अनिमेशन स्टुडिओची स्थापना  १९८५ मध्ये हयाओ मियाझाकी, इसाओ ताकाआणि तोशियो सुझुकी यांनी केली होती. 'घिबली आर्ट' स्टोरी लाइन आणि हाताने काढलेल्या अॅनिमेशन कैरेक्टरचा संदर्भ देत चित्र तयार करते. विशेषतः हाताने काढलेली आणि ऍक्रेलिक रंगांनी भरलेली दृश्ये दिसतात. घिबलीच्या चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि जपानी लोककथांचा प्रभाव दिसतो.

'अशी' बनवा चॅट जीपीटी वापरून 'घिबली स्टाइल इमेज -

१. चॅट जीपीटी उघडा व नवीन व्हर्जन सुरू करा.

२. प्रॉम्प्ट बारवरील तीन डॉट्स क्लिक करा, तिथे इमेज हा पर्याय निवडा.

३. आता तुम्हाला हव्या असलेल्या इमेजचे वर्णन द्या.

४. इमेज तयार झाल्यावर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.

चॅट जीपीटी प्लस नसेल तरी घिबली पोर्ट्रेट तयार करता येईल?
चॅट जीपीटी प्लस नसतानाही तुम्ही घिबली शैलीतील पोर्ट्रेट मोफत तयार करू शकता. ओपन एआयने आपल्या नवीन अपडेटमध्ये चॅट जीपीटी ४०  मध्ये एआय आधारित इमेज जनरेशनची सुविधा दिली आहे, ज्याचा वापर करून घिबली शैलीतील पोर्ट्रेट्स तयार करता येतात. यासाठी

१. 'ओपन एआय' च्या चॅट इंटरफेसमध्ये जा.

२. तुमचा फोटो अपलोड करा.

३. "Studio Ghibli style portrait" अशी कमांड द्या. त्यानंतर काही सेकंदांत तुमचे घिबली शैलीतील पोर्ट्रेट तयार होईल.

हेही वाचा