आज, आपण कर्माच्या धाग्यांची काळजी घेतल्याशिवाय, फक्त माणसाचे शारीरिक आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपल्याला जैवरसायनशास्त्रावर एक प्रकारचे प्रभुत्व मिळाले आहे. आपण औषधाने, शस्त्रक्रियेने जीवन लांबवण्याचा प्रयत्न करत आहोत.
सद्गुरू : आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, तुम्ही काही करत असाल किंवा नसाल तरीही, तुमचे कर्म विलीन होत असते. जीवन प्रक्रिया म्हणजेच कर्म विलीन होणे. तुम्हाला काही ठराविक कर्म दिले गेले आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. हे प्रारब्ध स्वतःहून संपत जाते. परंतु समस्या अशी आहे की, उत्पादनाचा कारखाना अतिरिक्त काम करत आहे - नवीन कर्म खूप जलद गतीने तयार होत आहे. विलीन होणे फक्त एका ठराविक गतीने होऊ शकते, परंतु निर्माण करण्यात लोक खूप प्रभावी असू शकतात! उदाहरणार्थ, तुमच्या जीवनातल्या एखाद्या दिवशी, जागे झाल्यापासून ते झोपेपर्यंत, तुम्ही प्रत्यक्ष कृतीद्वारे किती काम करता आणि गोष्टींचा किती विचार करता याची तुलना केल्यास, तुम्ही जे विचार करता ते, तुम्ही जे करता त्यापेक्षा पन्नास पट जास्त असू शकते.
समजा तुम्ही कोणतेही कर्म करत नाही आहात - निष्कर्म - तुम्ही फक्त बसून आहात. याचा अर्थ आत्ता सुद्धा कर्म अजूनही त्याच गतीने संपत आहे, परंतु तुम्ही वेगळे काहीही निर्माण करत नाही. म्हणूनच आध्यात्मिक वातावरण अशा प्रकारे तयार केले जाते की, कधी खायचे हे तुम्ही ठरवत नाही. एक घंटी वाजते आणि तुम्ही जाऊन जेवता. काय खायचे हे तुम्ही ठरवत नाही. जे वाढले जाते, ते तुम्ही आनंदाने जेवता. तुम्ही निवड करत नाही. आम्ही अन्नाचा आनंद घेण्याच्या विरोधात नाही, फक्त खाण्याच्या साध्या कृतीसाठी तुम्ही इच्छा, विचार आणि या सर्वांना वाढवून खूप कर्म निर्माण करता.
कृपया तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूकडे या प्रकारे पहा. तुम्ही दररोज जेवढे कर्म संपवता त्यापेक्षा पन्नास किंवा शंभर पट अधिक कर्म निर्माण करत आहात. जेव्हा तुम्ही जेवण बनवता, किंवा जेव्हा तुम्ही आनंदाने जेवता, ते पचवता आणि त्याला स्वतःचा भाग बनवता, तेव्हा तुम्ही कर्म संपवत आहात. साध्या जीवनाच्या प्रक्रियेने कर्म संपत
जातात.
आध्यात्मिक मार्ग म्हणजे आपण तुमच्या कर्माच्या प्रक्रियेला जलदगतीवर नेऊ इच्छितो. आम्ही, दिल्या गेलेल्या भारापेक्षा कर्माचा मोठा भार घेऊ इच्छितो कारण, आम्ही परत येऊन पुन्हा पुन्हा तेच करू इच्छित नाही. आम्हाला ते आत्ताच संपवायचे आहे. एखाद्याला ही निवड जाणीवपूर्वक करावी लागते - तुम्हाला ते सावकाश संपवायचे आहे की, सगळा मूर्खपणा शक्य तितक्या लवकर संपवायचा आहे.
जर तुम्ही एखाद्या सक्रिय आध्यात्मिक प्रक्रियेत प्रवेश केला, तर अचानक तुम्हाला आढळून येऊ शकते की, सर्व काही भांबावून टाकणाऱ्या वेगाने जात आहे. आध्यात्मिक असण्याचा अर्थ पेटून उठणे आहे - आतून, बाहेरून, सगळीकडून. तुम्ही कायमचे शांत झाल्यावरच शांतता लाभेल. ही उत्साही जीवनाची वेळ आहे! जर तुम्ही आनंदी किंवा अत्यानंदी आणि प्रसन्न असता, तर तुम्हाला शांत राहण्याचा विचार देखील आला असता का? असा विचारही तुमच्या मनात आला नसता.
कर्म म्हणजे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे, जे तुमच्याकडून अजाणपणे तयार केले गेले आहे. तुमच्या जन्मापूर्वी, गर्भधारणेनंतरच्या ४० ते ४८ दिवसांमध्ये, हा कर्माचा धागा स्प्रिंगप्रमाणे स्वतःला घट्ट गुंडाळत होता. भूतकाळातील माहिती, तुमची शारीरिक क्षमता, तुमच्या पालकांचे गुणधर्म, गर्भधारणेचा प्रकार आणि विविध घटकांवर अवलंबून, ते स्प्रिंगप्रमाणे गुंडाळण्यासाठी काही प्रमाणात माहिती निवडते. ते एका गुंडाळलेल्या स्प्रिंगप्रमाणे आहे. जर तुम्ही नुसते बसलात, तर ते हळूहळू स्वतःला सोडवेल. तुम्ही जितके स्थिर बसता, तितके लवकर ते स्वतःला सोडवेल परंतु तुम्ही कार्यरत आहात यामुळे आणि तुम्ही नवीन गोष्टीही गोळा करत आहात, म्हणून ते एका ठराविक गतीने स्वतःला सोडवत जाते.
भारतात ही एक सामान्य बाब होती, जेव्हा एखादे मूल जन्माला यायचे तेव्हा ते कुटुंब सर्वप्रथम घरी एखादा योगी किंवा ऋषी यांना आमंत्रित करायचे, किंवा त्या मुलाला त्यांच्याकडे घेऊन जायचे, कारण त्या मुलाला त्यांनी जाणावे अशी त्यांची इच्छा असायची. ते आजही तसे आहे, परंतु सामान्यतः वाढदिवसाच्या पार्ट्यांनी या गोष्टींची जागा घेतली आहे. अन्यथा, ही सर्वात महत्वपूर्ण गोष्ट होती. तुम्ही तुमच्या मुलाला अशा विशिष्ट व्यक्तीकडे घेऊन जाऊ इच्छिता जो स्प्रिंग अति प्रमाणात गुंडाळली आहे का ते पाहू शकतो, आणि ते ठीक करण्यासाठी काहीतरी करून मुलाच्या कल्याणाची खात्री करू शकतो. परंतु तरीही, एखादा मद्यपी चालक त्याला धडक देऊ शकतो. किंवा कोणी गुरू येऊन त्याला लवकर या विळख्यातून सोडवू शकतो किंवा त्याच्या सध्याच्या भारावर अनेक जन्मांच्या कर्माचा भार लादू शकतो. तर, कर्म एका विशिष्ट पद्धतीने विलीन होत असते जोपर्यंत वेगळे काहीतरी घडत नाही तोपर्यंत आणि पुन्हा एकदा ते पूर्णपणे गुंडाळले जाते किंवा ते खूप लवकर सोडले जाते.
आज, आपण कर्माच्या धाग्यांची काळजी घेतल्याशिवाय, फक्त माणसाचे शारीरिक आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपल्याला जैवरसायनशास्त्रावर एक प्रकारचे प्रभुत्व मिळाले आहे. आपण औषधे वापरून आणि शस्त्रक्रिया करून जीवन लांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे एक प्रमुख कारण असू शकते, ज्यामुळे अनेक लोक एका विशिष्ट कालावधीनंतर स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमता गमावतात, कारण ते एक "बधिर संगणक" बनतात - तुम्ही काहीही करा, ते फक्त तुमच्याकडे एकटक पाहत राहतात, कारण सॉफ्टवेअर जरी संपले असले तरी, बदलेल्या हृदयामुळे किंवा मूत्रपिंडामुळे हार्डवेअर अजूनही चालू ठेवले जाते.
जर त्यांनी जीवनाच्या दुसऱ्या आयामाला विकसित करण्याचा प्रयत्न केला असता आणि थोडेसे आध्यात्मिक कार्य - भौतिकापलीकडचे काहीतरी - केले असते, तर तुम्ही जरी हजार वर्षे जगलात, तरी तुम्ही आवश्यक असे सॉफ्टवेअर निर्माण करू शकता, कारण एका वेगळ्या ठिकाणी अजूनही बरेच सामान आहे. कर्माचे एक भांडार आहे, जे सध्या उघडले गेले नाहीये, ज्याला संचित म्हणतात. किंवा, तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार केलेले असते की, ज्यावेळी तुमचे सॉफ्टवेअर निघून जात आहे, तेव्हा तुमचे हार्डवेअर सोडण्याकरिता देखील तुम्ही स्वतंत्र्य आहात.
सद्गुरु
(ईशा फाऊंडेशन)