चिकन मलाई कोफ्ता

Story: चमचमीत रविवार |
30th March, 02:35 am
चिकन मलाई कोफ्ता

साहित्य  

अर्धा किलो चिकन, एक कांदा, ७ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट, एक मोठा चमचा दही, दहा पुदिना पाने बारीक कापून, एक लहान चमचा काळीमिरी पावडर, एक चमचा भाजलेली जिरा पावडर, दोन चमचे चिली फ्लेक्स, दोन चमचे क्रीम, एक चमचा गरम मसाला, दोन ब्रेड स्लाईस, चवीनुसार मीठ.

ग्रेव्हीसाठी 

एक मोठा कांदा, सहा हिरव्या मिरच्या, एक लहान तुकडा आले बारीक कापून, आठ काजू बिया, एक चमचा मगज बिया, वेलची चार, अर्धा कप दही, आठ लसणाच्या पाकळ्या, एक चमचा गरम मसाला पावडर, एक चमचा काळीमिरी पावडर, दोन चमचे कसूरी मेथी, चवीनुसार मीठ.

कृती 

 चिकनचे लहान तुकडे करून स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, मसाले, मीठ क्रीम, दही चिकनला लावून मुरवत ठेवा. त्यात ब्रेडचा चुरा घाला आणि मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या.एका पातेल्यात तेल तापवत ठेवा. त्यात चिरलेला कांदा, आले लसूण, हिरव्या मिरच्या, काजू, मगज बिया घालून तळसावून घ्या. रंग बदलता कामा नये. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटा. कढईत तेल घालून त्यात चिकनचे गोळे तळून बाजूला ठेवा. एका पातेल्यात तेल घालून वेलची व वरील वाटलेली पेस्ट घालून दोन मिनिटे परतून घ्या. आंच मंद करून फेटलेले दही, सर्व मसाले, काळीमिरी पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला. क्रीम घालून ढवळत रहा. त्यात तळलेले कोफ्ते घाला, कसूरी मेथी चुरडून घाला आणि तीन ते चार मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. सजावटीसाठी वरुन क्रीम घाला. तयार आहे चिकन मलाई कोफ्ता.


कविता आमोणकर