केरी- सत्तरी : येथील वाळवंटी नदीच्या पात्रात बुडून अमोथ पचांगे (१९, मेरशी व मूळ कर्नाटक) याचा मृत्यू झाला.
वाळवंटी नदीकिनारी फिरण्यासाठी काही जण आले होते. त्यातील काही जण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. अमोथ पचांगे हा पोहण्यासाठी नदीत उतरला होता. मात्र, तो अचानक नदीपात्रात बुडू लागला. बुडणाऱ्या अमोथला त्याच्या दोघा मित्रांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याला साखळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.