दिल्ली : नोएडा येथील बंगल्यातून आंतरराष्ट्रीय पोर्न सिंडीकेटचा पर्दाफाश

दाम्पत्याने न्यूड व्हिडिओंमधून कमावले २२ कोटी रुपये; ईडीचा धक्कादायक खुलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th March, 12:46 pm
दिल्ली : नोएडा येथील बंगल्यातून आंतरराष्ट्रीय पोर्न सिंडीकेटचा पर्दाफाश

नोएडा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोएडामध्ये छापे टाकून पॉर्न स्कँडलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पती-पत्नी एकत्र अश्लील व्हिडिओज बनवून ते विविध पोर्न साइट्सवर विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी ते सोशल मीडियाच्या मदतीने विविध मॉडेल्सना फोन करायचे. पती या मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ बनवून ते परदेशात स्थित पोर्न कंपन्यांना विकत असे. त्या बदल्यात, त्या जोडप्याला मोठी रक्कम मिळत असे. हे दोघे नंतर या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम  मॉडेल्सना देत असत.



ईडीचा छापा 

परदेशातून तब्बल २२ कोटी नोएडा येथील व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची टीप हाती लागल्याने ईडी अलर्टमोडवर आली. मनी लॉन्ड्रिंग, हवाला किंवा अतिरेकी कारवायांसाठी हा निधी पुरवला जात असावा या संशयाने ईडी आणि संबंधित यंत्रणांनी तयारी केली. त्यांनी सापळा रचून शुक्रवारी, २८ मार्च रोजी नोएडा सेक्टर १०५ मधील बंगला सी-२३४ वर छापा टाकला. ईडीच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा तिथे मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ बनवले जात असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. या प्रकरणातील दोन आरोपींची चौकशी करत  ईडीने जागीच ताब्यात घेत अटक केली आहे. याशिवाय, पथकाने ८ लाख रुपये रोख जप्त केले.


काय समोर आले ? 

ईडीने आरोपींची चौकशी केली तेव्हा उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी मिळून 'सब-डिजी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केल्याचे उघड झाले. उज्ज्वल किशोर हा कंपनीचे संचालक आहेत. त्याची पत्नी नीलू त्यांना या कामात मदत करायची. कंपनी जाहिरात, मार्केट रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण करण्याचे काम करते असे नीलू आणि उज्ज्वल सर्वांना सांगायचे.  सब-डिजी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने सायप्रसस्थित कंपनी 'टेक्नियस लिमिटेड' सोबत करार केला होता. 'टेक्नियस लिमिटेड' ही एक होस्टिंग कंपनी आहे जी पोर्नोग्राफिक सामग्री असलेल्या मोठ्या वेबसाइट्स होस्ट करते. याद्वारे, सब-डिजी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे कंटेंट 'टेक्नियस लिमिटेड' ला पाठवत असे आणि टेक्नियस लिमिटेड ते कंटेंट मोठ्या वेबसाइटवर अपलोड करत असे.


Image


सोशल मीडियाद्वारे मॉडेलशी संपर्क साधला जायचा 

फेसबुक आणि 'एक्स' सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मॉडेलिंगच्या जाहिराती दिल्या जात होत्या. जाहिरातींच्या आधारे मॉडेल्स या दोघांशी संपर्क साधत असे. यानंतर, मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ लाईव्ह कॅमेऱ्यात शूट केले जायचे. ते एका परदेशी कंपनीला पाठवले जायचे. मॉडेलला कमाईच्या २५टक्के मिळत असे. आरोपींनी आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक मॉडेल्सना कामावर ठेवले आहे. फ्लॅटची झडती घेतली असता एक व्यावसायिक वेबकॅम स्टुडिओ आणि ओन्लीफॅन्स सारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेले व्हिडिओ सापडले. ईडीने सांगितले की, अधिकारी छाप्यासाठी आले तेव्हा स्टुडिओमध्ये तीन महिला उपस्थित होत्या आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. 



मुख्य आरोपी सिंडिकेटचा भाग 

ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (फेमा) च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची सर्वप्रथम चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, सबडिजी कंपनी आणि तिच्या संचालकांच्या बँकांमध्ये परदेशातून १५.६६ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले. याशिवाय, नेदरलँड्समध्ये एक खाते देखील आढळून आले. यातून सुमारे ७ कोटी रुपये पाठवण्यात आले होते. ही रक्कम आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे भारतात रोखीने काढली गेली आहे. असे करून आरोपींनी २२ कोटी रुपये कमावले आहेत.


Image


याचमुळे ईडीचे लक्ष याकडे वेधले गेले. मुख्य आरोपी यापूर्वी रशियामध्ये अशाच प्रकारच्या सिंडिकेटचा भाग होता. नंतर, तो भारतात आला आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत पोर्नोग्राफी रॅकेट सुरू केले. हे जोडपे गेल्या ५ वर्षांपासून या व्यवसायात गुंतले आहे. 

हेही वाचा