कर्नाटक : अनमोड चेकनाक्यावर ३.६६ लाखांची गोवानिर्मित दारू जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
30th March, 01:20 pm
कर्नाटक : अनमोड चेकनाक्यावर ३.६६ लाखांची गोवानिर्मित दारू जप्त

जोयडा : फोंडा येथून मुंबईत जाणाऱ्या कंटेनरमधून अनमोड अबकारी चेकनाक्यावर  ३ लाख ६६ हजार रुपये किंमतीची गोवा निर्मित दारू जप्त करण्यात आली.  या प्रकरणी भवन मुराजी गांधी (रा. नवी मुंबई ) याला अटक केली आहे. 

हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री गोव्यातील फोंडा येथून येणाऱ्या एका कंटेनरमधून गोवा निर्मित दारूची तस्करी होत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार अनमोड येथे या कंटेनरची तपासणी केली असता चालकाच्या कॅबिनमध्ये असलेल्या चोर कप्प्यात दारू सापडली.

त्यामध्ये रॉयल ग्रीन व्हिस्की २० बॉक्स, ओकस्मिथ गोल्ड कंपनीच्या दारूचे १० बॉक्स सापडले. भवन मुराजी गांधी याच्याकडून २२  लाख रुपये किंमतीचे वाहन, बर्जर कंपनीचा सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा पेंट आणि ३ लाख ६६ हजार रुपये किंमतीची दारू असे एकूण २९ लाख ४१  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ही कारवाई अनमोड  अबकारी विभागाचे अबकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपनिरीक्षक टी बी मल्लणवर, कर्मचारी श्रीकांत जाधव, दीपक बारामती, महंतेश हुन्नूर, श्रीशैल हडपद, प्रवीण होसकोटी उपस्थित होते.

हेही वाचा