बार्देशः म्हापशात ३ लाखाच्या बनावट आयफोनच्या वस्तू जप्त

गुन्हा शाखेचा चार दुकानांवर छापा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 12:30 am
बार्देशः म्हापशात ३ लाखाच्या बनावट आयफोनच्या वस्तू जप्त

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : पोलिसांच्या गुन्हा शाखेने म्हापसा बाजारपेठेतील चार मोबाईल विक्री दुकानांवर छापा टाकून आयफोनची सुमारे ३ लाखांची बनावट अक्सेसरीस (उपकरणे) जप्त केली. गुरूवारी २७ रोजी सायंकाळी ही कारवाई पोलिसांनी आयफोन कंपनीचे भारतीय प्रतिनिधी महमद ताकीर यांच्या तक्रारीच्या आधारे केली. आयफोन कंपनीला म्हापसा मार्केट मधील काही दुकानांमध्ये आयफोनचे बनावट अक्सेसरीस विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. 


त्यानुसार त्यांनी गुन्हा शाखेकडे तक्रार केली. गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जान्हवी कॉर्नर, सुपर टेलिकॉम व कृष्णा मोबाईल्स या मोबाईल्सच्या वस्तू विक्री दुकानांवर छापा टाकला आणि मालाची पडताळणी करून नऊ गोणी वस्तू जप्त केल्या.

 
आयफोनचे बॅक पॅनल, बॅटरी, चार्जिंग प्लेक्स, फ्लॅशलाईट, वायरसलेस चार्जिंग, कॅमेरा, ईअर फोन, बॅक कव्हर, डेटा कव्हर या सारख्या वस्तूंचा समावेश होता. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत जवळपास तीन लाख रुपये आहे. या बनावटगिरी प्रकरणी पोलिसांनी संबंधित चारही दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.      

हेही वाचा