सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचे निधन

हृदयविकारामुळे हान यांना रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th March, 10:48 am
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचे निधन

सियोल:  दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही  यांचे आज मंगळवारी निधन झाले. हान जोंग ही यांना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांचे  निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. 

हान जोंग ही हे ६३ वर्षांचे होते. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या एका प्रवक्त्याने हान जोंग यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. को-सीईओ हान जोंग यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दुसऱ्या को-सीईओ निवडीबाबत अद्याप निर्णय नाही
हान जोंग-ही  हे सॅमसंगच्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिवाइसेज विभागाचे पर्यवेक्षक होते. सध्या त्यांच्या जागी कोण येणार हे निश्चित झालेले नाही.


हान जोंग-ही यांच्यामुळे सॅमसंग टीव्ही व्यवसायाला उभारी 
इन्हा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर हान जोंग-ही १९८८ मध्ये सॅमसंगमध्ये सामील झाले. २०११ ते २०१३ पर्यंत ते व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसच्या उत्पादन संशोधन आणि विकास टीमचे प्रमुख होते. त्यानंतर हान जोंग-ही यांनी २०१७ मध्ये व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसची जबाबदारी घेतली आणि २०२१ मध्ये त्यांची उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून निवड झाली. कोरिया जोंगआंग डेलीच्या वृत्तानुसार, कंपनीच्या टीव्ही व्यवसायाच्या विकास आणि मार्केटिंगचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले आहेत.

हेही वाचा