बर्च अग्नितांडव प्रकरण:सरपंच रेडकर,सचिव बागकर यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
बर्च अग्नितांडव प्रकरण:सरपंच रेडकर,सचिव बागकर यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

म्हापसा : बर्च अग्नितांडव प्रकरणानंतर हडफडे-नागवा पंचायतीचे सरपंच (Sarpanch) रोशन रेडकर आणि तत्कालीन पंचायत सचिव (Panchayat Secretary) (निलंबित) रघुवीर बागकर यांनी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात दोघांनाही पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी रेडकर व बागकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.  गेल्या ६ डिसेंबर रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane Club) क्लबला भीषण आग लागली होती, यामध्ये २५ निष्पाप लोकांचा मृत्यु झाला होता, तर सहाजण जखमी झाले होते. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी यालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते.  या दुर्घटनेनंतर सरकारने बागकर याला सेवेतून निलंबित केले होते.

लुथरा बंधूंच्या जामीन अर्जांवरील ७ जानेवारीपर्यंत तहकूब 

दरम्यान, क्लबला उत्पादन शुल्क परवाना मिळावा म्हणून कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट आरोग्य दाखला प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ७ जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

अजयच्या अर्जावरील सुनावणी ६ पर्यंत तहकूब

 अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ६ जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


हेही वाचा