जिल्हा पंचायत: उत्तर गोवा अध्यक्षपदी रेश्मा तर उपाध्यक्ष नामदेव : दोघांचीही बिनविरोध निवड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
41 mins ago
जिल्हा पंचायत: उत्तर गोवा अध्यक्षपदी रेश्मा तर उपाध्यक्ष नामदेव : दोघांचीही बिनविरोध निवड

पणजी : गोव्यात (Goa) जिल्हा पंचायतीच्या (Zilla Panchayat)  उत्तर गोवा (North Goa) अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी यांची  बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. आज केवळ औपचारिकता पार पडली. 

सोमवारी भाजपच्या रेश्मा बांदोडकर यांनी अध्यक्षपदासाठी तर नामदेव च्यारी यांनी उपाध्यक्षपदासाठी पणजीतील जिल्हा पंचायत कार्यालयात अर्ज दाखल केले होते. आज मंगळवारी ठरलेली प्रक्रिया पार पडून हे दोघेही बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, या दोघांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याने, निवडून आलेले सहकारी जिल्हा पंचायत सदस्य, भाजप नेते व इतरांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा