गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादला लँडिंग

उत्तर भारतातील बिघडलेले हवामान ठरले कारण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27 mins ago
गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादला लँडिंग

नवी दिल्ली :  उत्तर भारतासह दिल्लीत पडलेल्या दाट धुक्याचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. रविवारी रात्री गोव्याच्या मोपा येथून दिल्लीकडे झेपावलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले.



मिळालेल्या माहितीनुसार,  हे विमान गोव्याहून रात्री ११:५५ वाजता झेपावले होते आणि सोमवारी पहाटे २:३५ वाजता दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीतील दृश्यमानता अत्यंत कमी झाल्यामुळे पायलटला लँडिंगसाठी परवानगी मिळाली नाही. जयपूर विमानतळावर आधीच अनेक विमाने वळवण्यात आल्याने तिथे मोठी गर्दी होती, परिणामी या विमानाला अहमदाबादला उतरवण्यात आले. दिल्ली विमानतळावर 'कॅट-३' (CAT III) यंत्रणेद्वारे लँडिंगचे प्रयत्न सुरू असूनही अनेक विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले आहे.


flight cancellations ahmedabad airport sees chaos after fog-driven flight  delays check aqi of your area flight status | Ahmedabad News - Times Now


हवामान विभागाने दिल्लीसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून धुक्याचा हा प्रभाव सोमवारी दिवसभर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवाशांसाठी 'फॉग केअर'  उपक्रम सुरू केला आहे. ज्या प्रवाशांच्या विमानांना विलंब झाला आहे किंवा मार्ग बदलण्यात आले आहेत, त्यांना विनामूल्य रि-शेड्युलिंग किंवा पूर्ण परताव्याचा पर्याय दिला जात आहे. इंडिगोसह अन्य विमान कंपन्यांनीही प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस तपासून पाहण्याचे आवाहन केले आहे. दाट धुक्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा