जमीन वाचवण्यासह मांडवीतील कॅसिनो हटवण्यासाठी जाहीरनामा

गोवा वाचवण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन निवृत्त न्या. फेर्दीन रिबेलो यांनी गोवेकरांना केले आहे. जमीन विक्राबाबत ठोस उपाय करतानाच मांडवीतील कॅसिनो हटवण्यासाठी चळवळ उभारण्यासाठी आपण सहकार्य करायला तयार असल्याचे म्हणत आपला व्हट्सॲप नंबर शेअर केला आहे.
‘मी वृत्तपत्रांत वाचले की हरमल येथे वनक्षेत्रातील विकासाविरोधात नागरिकांनी मोर्चा काढला. डोंगर, तळ्या, नद्या, समुद्रकिनारे आणि आमची गावे वाचवण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण गोव्यात लोकचळवळीने पुढे यायला हवे. दररोज आम्हाला अवघ्या एका तासासाठी पाणी मिळते, तर दुसरीकडे शेकडो प्लॉट्स व जलतरण तलाव उभारत आहेत. आपण सगळे मिळून यासाठी काम करू शकतो का? मी मदत करण्यास तयार आहे’ असे न्या. रिबेलो यांनी म्हटले आहे.
मला त्यासाठी कृपया व्हॉट्सअॅप करा असे आवाहन करून रेबेलो यांनी आपला नंबर शेअर केला आहे.

📞 9819839292
न्या. फेर्दीन रिबेलो यांनी सूचवलेला लोकजाहीरनामा (People’s Charter) पुढे दिल्या प्रमाणेः
१ : उतार कितीही असला तरी कोणत्याही डोंगरावर विकासास परवानगी देऊ नये.
२ : झोनिंग/वापर बदलास (Change of User) परवानगी देणारे सर्व कायदे मागील प्रभावासह रद्द करावेत.

३ : जे विकासकाम मंजूर नाही किंवा सुरूच झालेले नाही, अशा कोणत्याही नव्या विकासाला परवानगी देऊ नये.
४ : सर्व विकासकामे ‘पूर्वतपासणी तत्त्वा’नुसार असावीत; सध्यातरी किंवा भविष्यातही पर्यावरणाला हानी होणार नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी विकासकाची असावी.
५ : गावांमध्ये प्लॉट विकासाला परवानगी देण्याआधी त्या भागाची वहनक्षमता (Carrying Capacity) अभ्यासून अहवाल सादर करणे बंधनकारक असावे.

६ : खोटे अहवाल/नोंदी सादर करणाऱ्या सर्व अधिकारी, वास्तुविशारद व सर्व्हेअर यांच्यावर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई व्हावी.
७ : सीआरझेडमधील सर्व बेकायदेशीर विकास प्रथम सील करावेत, सर्व परवाने रद्द करून ते पाडावेत.
८ : मांडवी नदीतील सर्व कॅसिनो हटवावेत.
गोव्यातील जनेतेने लोकचळवळ उभारावी या हेतूने न्या. रिबेलो यांनी हे एक पाऊल टाकले आहे.

——
APPEAL FROM JUSTICE FERDINO REBELLO
Today I read in the newspapers, people in Arambol taking out a procession against development in forest areas.This should become a people’s movement all over Goa to protect our hills, lakes,rivers, seashores , our villages from developers who are creating hundreds of plots with swimming pools while we hardly get 1 hours water everyday. Can we work together.I am willing to help.
kindly WhatsApp
Justice Ferdino Rebello
9819839292
————————————-
PEOPLE’S CHARTER SUGGESTED
- No hill should be developed irrespective of gradient.
- All laws which permit change of zoning (user) should be repealed with retrospective effect.
![]()
- No further development should be allowed which has not been or continued.
- All development should be subject to precautionary principles, the developer must prove that there will be no environmental damage now or in the future.
- No development of plots in villages unless the carrying capacity is studied and report submitted.
- All officers/Architects/Surveyors who file false notes/reports should be subject to criminal and disciplinary action.

- All illegal development in CRZ should be first sealed, all licenses canceled and demolished.
- All casinos in Mandovi should be removed.