बर्च क्लबमधील गैरव्यवहारांची प्रशासनाला आधीच कल्पना दिली होती : प्रदीप घाडी आमोणकर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
42 mins ago
बर्च क्लबमधील गैरव्यवहारांची प्रशासनाला आधीच कल्पना दिली होती : प्रदीप घाडी आमोणकर

पणजी: बर्च क्लबमधील गैरव्यवहारांबाबत मी संबंधित विभागांना यापूर्वीच माहिती दिली होती. जर प्रशासनाने वेळेत चौकशी करून कारवाई केली असती, तर ही दुर्घटना टळली असती, असे वक्तव्य प्रदीप घाडी आमोणकर यांनी केले आहे. हणजूण पोलिसांनी सोमवारी 'बर्च बाय रोमिओ' क्लब दुर्घटनेप्रकरणी आमोणकर यांची चौकशी केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रदीप घाडी आमोणकर हे या क्लबच्या मालमत्तेत भागीदार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. आमोणकर म्हणाले की, १९९४ पासून पुढील १० वर्षे मी या क्लबचा मालक होतो आणि हॉटेल व्यवसाय चालवला. मात्र, क्लबमधील गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर मी सुरेंद्र कुमार खोसला यांच्यासोबतचा करार रद्द केला. त्यानंतर माझा या क्लबशी कोणताही संबंध राहिला नाही. याबाबत मी संबंधित सरकारी खात्यांशी पत्रव्यवहारही केला होता.

आमोणकर यांनी पोलिसांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सुपूर्द केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनेही आमोणकर यांचा जबाब नोंदवला असून, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे.

हेही वाचा