साहित्य :
३ ते ४ जुड्या पालक.
२ उभा चिरलेला कांदा व २ बारीक चिरलेला.
२ ते ३ मिरच्या
२ उभे चिरलेले टोमॅटो
बटर / तेल
१ बारीक चमचा जिरं
मॅजिक मसाला
१ बारीक चमचा धने पूड
१ बारीक चमचा गरम मसाला
१ चमचा कसुरी मेथी
मोठा ३ ते ४ चमचे फ्रेश क्रीम
२०० ग्राम पनीर
कृती :
प्रथम एका भांड्यात स्वच्छ पाण्याने छान धुतलेली ३ ते ४ पालकाच्या जुड्या, २ उभा चिरलेला कांदा, २ ते ३ मिरच्या, २ उभे चिरलेले टोमॅटो घ्या. यात ४ ते ५ कप पाणी घाला व १५ ते २० मिनटं हे शिजवून घ्या. हे मिश्रण शिजलं की बारीक वाटून घ्या. आता एका भांड्यात ३ ते ४ चमचे बटर /तेल घ्या. तेल तापलं की त्यात १ बारीक चमचा जिरं घाला व जिरं फुलेपर्यंत भाजून घ्या.जिरं फुलले की त्यात २ बारीक चिरलेला कांदे घाला. कांद्याला सोनेरी रंग आला की मॅजिक मसाला, १ बारीक चमचा धने पूड, १ बारीक चमचा गरम मसाला घाला व ३ ते ४ मिनटं परतून घ्या. आता यात वाटलेलं पालकचं मिश्रण घाला व एक उखळी काढून घ्या. मग यात पनीर घाला व २ ते ३ मिनटं पनीर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. हाताने बारीक करून कसुरी मेथी, वरून फ्रेश क्रेम आणि १ चमचा बटर घाला. तर अश्या प्रकारे चमचमीत पालक पनीर तयार आहे. तुम्ही नान रोटी किंवा पावा बरोबर खाऊ शकता.
संचिता केळकर